नितीन गडकरी यांचा मोठा दावा, थेट खळबळ, म्हणाले, माझ्याविरोधात एक लॉबी.. – Marathi News | Union Minister Nitin Gadkari has made major revelation regarding the use of ethanol


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना घोषणा केली होती. त्यांनी 100 टक्के इथेनॉलला हिरवा कंदी दाखवला. त्यांनी त्या फाईलवर सही केली. केंद्र सरकारकडून मोठा आदेशही इथेनॉलबाबत काढण्यात आला. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी इथेनॉल पर्याय सरकारने आणला त्याबाबत मोठे निर्णय घेतले जात आहेत. मात्र, नितीन गडकरी यांच्या इथेनॉल वापराला काही जणांकडून कडाडून विरोध केला जात आहे. मात्र, इथेनॉलच्या वापराकरिता नितीन गडकरी आग्रही आहेत. नितीन गडकरी यांच्या इथेनॉलच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज ठाकरे नितीन गडकरी यांच्यावर टीका करताना दिसले. इथेनॉलच्या मुद्द्यात आपल्याला नक्की टारगेट का केले जात आहे, यावर स्पष्टपणे बोलताना नुकताच नितीन गडकरी दिसले. त्यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचेही म्हटले.

नुकताच नितीन गडकरी हे एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी त्यांनी थेट इथेनॉलला काही लोकांकडून नक्की का विरोध होत आहे, यावर भाष्य केले. नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या देशात 22 कोटी रूपयांचे पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात होतो. त्यात 40 टक्के वायू प्रदूषण वाहनांनी होते. इराण आणि अमेरिका युद्धात काय परिस्थिती इंधनाची होती, हे सर्वांनाच माहिती आहे.

आपण निर्भर भारत झाले पाहिजे. देशात पर्यायी इंधन असले पाहिजे. मी फक्त इथेनॉलच बद्दल बोलत नाही. इथेनॉलबद्दल माझ्याबाबत जो काही प्रचार केला जात आहे, तो पेड कॅंपेन आहे. मुळात म्हणजे देशात दरवर्षी तब्बल 1500 कोटी लिटर इथेनॉल लागते. याचा वापर होण्यापूर्वी कारखान्यात अल्कोहोल तयार करायचो. मुळात म्हणजे इथेनॉलचे जे दर आहेत, ते सरकार ठरवते.

शेतकरी अन्नदाता नव्हे तर इंधनदाताही आहे. नितीन गडकरी यांनी यादरम्यान पुढे बोलताना म्हटले की, इथेनॉलच्या वापरामुळे आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. देशात प्रत्येक वर्षी तब्बल 23 लाख कोटी रूपयांच्या इंधनाची आयात होते. काही लोकांना वाटते की, मी त्यांचा बिझनेस बंद करेल. त्यामुळे ती एक लॉबी माझ्यावर नाराज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *