Jejuri Warkari Accident : ताप आल्यानं ड्राईव्हरने गोळ्या खाल्ल्या अन् ग्लानी आली, जेजुरीत अपघात कसा झाला? मोठी माहिती समोर | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident : सासवड जेजुरी रोडवरून जात असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झालाय.

Saswad Jejuri Road Driver took pills for fever and felt drowsy
Saswad Jejuri Road Driver took pills for fever and felt drowsy

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Truck Accident : विठ्ठलाचं नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेने जात असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात मोठं विघ्न आलं आहे. सासवड–जेजुरी रस्त्यावर चालत असलेल्या वारकऱ्यांवर ट्रक गेल्याने काही वारकऱ्यांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जेजुरी जवळील बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे 500 मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर एक गंभीर रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता ट्रक ड्राईव्हर विषयी मोठी माहिती समोर आलीये.

तापाच्या गोळ्या घेतल्या अन् ग्लानी आली

अपघात झालेला ट्रक वारीसाठी शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. गेल्या काही दिवसांपासून तो ट्रक चालवत असल्यानं ट्रक ड्राईव्हरला ताप आला होता. त्यानंतर त्याने तापाच्या गोळ्या घेतल्यानं त्याला ग्लानी आली. त्यानंतर ड्राईव्हरचा ट्रकवरील ताबा सुटला अन् ट्रक थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती समोर आली आहे.

तीन महिलांचा अपघातात मृत्यू

अपघातग्रस्तांमध्ये सांगली जिल्ह्यातील कासबेडीगराज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच जखमींची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार गंभीर जखमी असलेल्या महिलांना भेटण्यासाठी जेजुरी येथील खासगी रुग्णालयात देखील गेल्या अन् त्यांची विचारपूस केली. पोलिस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करत आहेत.

माऊलींच्या पालखीचं जेजुरीकडे प्रस्थान

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांच्या मदतीने जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून डॉक्टर त्यांच्यावर शर्थीचे उपचार करत आहेत. सासवड येथील मुक्कामानंतर आज माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील ही दिंडी होती. या दिंडीत सांगली जिल्ह्यातील अनेक वारकरी होत्या.

मराठी बातम्या/पुणे/

Jejuri Warkari Accident : ताप आल्यानं ड्राईव्हरने गोळ्या खाल्ल्या अन् ग्लानी आली, जेजुरीत अपघात कसा झाला? मोठी माहिती समोर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *