Buldhana Crime : बुलढाण्यात प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू, रात्री एकटेच रानात गेले अन् पुढच्या 2 तासात घडलं भयंकर! | मराठी बातम्या (Latest Marathi News)


Last Updated:

Dr Gopal Soni Death Mistry : डॉ. गोपाल सोनी यांच्या भावाने दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

Buldhana Crime Dr Gopal Soni Suspicious death
Buldhana Crime Dr Gopal Soni Suspicious death

Buldhana Dr Gopal Soni Death Case : सोलापूरमधील प्रचलित डॉ शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असताना आता बुलढाण्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. बुलढाणामधील खामगाव शहरातील प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. गोपाल सोनी यांची बॉडी शेतात संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सध्या खामगावात भीतीचं वातावरण पहायला मिळतंय.

अवघ्या दीड ते दोन तासांत मृतदेह सापडला

डॉ. गोपाल सोनी हे खामगाव शहरातील एक प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि ‘सोनी रक्तपेढी’चे संचालक म्हणून सुपरिचित होते. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गोपाल सोनी हे घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी एकटेच त्यांच्या रानात गेले होते. रात्रीच्या सुमारास त्यांनी रानात जायचं का ठरवलं? असा प्रश्न देखील विचारला जातोय. शेतात गेल्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांच्या कालावधीतच त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.

संशयास्पद मृत्यू नेमका कशामुळे?

एका नामांकित डॉक्टरांचा असा अचानक आणि संशयास्पद मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत खामगाव शहरात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते अत्यंत प्रामाणिकपणे रुग्णांना रक्तपेढीच्या माध्यमातून सेवा देत होते. त्यांच्या याच अविरत सेवेमुळे केवळ खामगाव शहरातच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि दांडगा परिचय होता. अशातच त्यांच्या मृत्यूने पोलिसांमध्ये देखील मोठी खळबळ उडाली असून संशयाचं वातावरण तयार झालंय.

नैसर्गिक मृत्यू की घातपात?

डॉ. गोपाल सोनी यांच्या भावाने दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. हा मृत्यू नेमका नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे की यामागे एखादा मोठा घातपात आहे, या दिशेने पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळतंय की काय? असा सवाल देखील विचारला आज आहे. तसेच मृत्यूमागील गूढ आणि सत्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जातीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *