धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू


Mumbai News : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये रक्ताची उलटी झाल्यामुळे एका 30 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत सबवे बाहेर ही धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी सबवे शेजारी असलेल्या शालिमार गेस्ट हाऊस मध्ये 30 वर्षीय मुलीला रक्ताच्या उलटी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. परवा रात्री 50 वर्षीय प्रियकरासोबत 30 वर्षीय मुलगी आली होती. यावेळी ही घटना घडली. 

मयत मुलीचा रक्ताच्या नमुने घेऊन तपासासाठी लॅब मध्ये पाठवले 

या जोडप्याने आधी हॉटेलच्या बाहेर दारू पार्टी करून मग शालीमार हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते. पहाटे चार वाजता या जोडप्याने ऑनलाईन जेवण मागवले यानंतर हॉटेलमध्ये पुन्हा दारु पार्टी केली. पार्टी केल्यानंतर मुलीला रक्ताची उलटी झाली यानंतर काल दुपारी प्रियकरांनी या संदर्भात अंधेरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी डॉक्टरांना घेऊन शालीमार गेस्ट हाऊस मध्ये गेले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. सध्या या संदर्भात अंधेरी पोलिसांनी मयत मुलीचा रक्ताच्या नमुने घेऊन तपासासाठी लॅब मध्ये पाठवले आहेत. 30 वर्षीय महिलेचा प्रियकर आणि महिला मागील काही वर्षापासून प्रेम संबंधात होते, महिला विक्रोळी परिसरात राहणारी होती तर त्याच्या प्रियकर हा दहिसर पश्चिम परिसरात राहणारा आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी एडीआर दाखल करून मुलीच्या मृत्यू दारूची पार्टी केल्यामुळे झाली आहे. या संदर्भात पुढील तपास अंधेरी पोलीस करत आहे.

धाराशिवच्या कळंबमध्ये घ शीतपेय पिल्याने 2 नर्सेसला विषबाधा

धाराशिवच्या कळंबमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शीतपेय पिल्याने 2 नर्सेसला विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर या दोन नर्सेस ला विषबाधा झाली आहे. पूजा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलला अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.

शीतपेय वाटण्या अगोदरच नर्सेसला विषबाधा

धाराशिवमध्ये शेगावच्या गजानन महाराजांच्या वारीत शीतपेय वाटले जाणार होते, अशी माहिती मिळत आहे.   शीतपेय वाटण्या अगोदरच नर्सेसला विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्याची घटना घडल्यानंतर एफडीएचे पथक घटनास्थळी झाले आहे. एफडीएने वारीत वाटले जाणारे हे शीतपेय जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासन पोलीस व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शीतपेय कुठून आले कोण वाटणार होते? याचा तपास सुरु आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *