Jalna News : जालना जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकास कामावरुन भाजप शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जोरदार टीका केली आहे. शहरातील भीम पार्कला माजी आमदाराचा विरोध असल्याचे खोतकर म्हणाले. महानगर पालिकेच्या अजेंड्यावर हा विषय येऊ दिला नाही, याचा मी जाहीर विरोध करतो असे खोतकर म्हणाले. तर जे झाले नाही त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न खोतकर करत असल्याचे गोरंट्याल म्हणाले. दलित समाजाला खोतकर माझ्या विरोधात उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.
जे झालंच नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न : कैलास गोरंट्याल
जालन्यात विकास कामावरुन राज्यात सत्तेत बसलेल्या शिवसेना-भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्येच जुंपल्याच पाहायला मिळत आहे. शहरातील प्रस्तावित भीम पार्कला भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोध केला तसेच महानगरपालिकेच्या अजेंडा वरती भीम पार्कचा विषय येऊ दिला नाही, याचा मी निषेध करतो म्हणत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली. तर विद्यमान आमदाराला या बाबत काही कळत नाही, जे झालंच नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडून दलित समुदायाला माझ्या विरोधात उचकावण्याचा खोतकर प्रयत्न करत असल्याचे प्रत्युत्तर कैलास गोरंट्यांनी दिलं आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्र बसलेल्या जालना महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा