Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut: विनायक राऊतांना अटक करा, आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला; गिरीजाच्या आईची मागणी, नेमकं काय म्हणाल्या?


Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, प्रत्येक बाबतीत खोटं बोलून विश्वासघात केला, असा आरोप गिरीजा राऊत यांनी केला. आता सून गिरीजा राऊत यांच्या आरोपावर विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले.  (Vinayak Raut On Girija Raut) गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. 2017 ते 2018 पर्यंत गितेश आणि आपल्यात कुठलेच शारिरीक संबंध नव्हते. गितेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा आरोप गिरीजा राऊतांनी केला. दरम्यान, गिरीजा राऊतांचे सगळे आरोप विनायक राऊतांनी फेटाळून लावले. (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)

मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले. आता गिरीजाच्या आई पूजा पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्वाची माहिती समोर आणली आहे. 

आम्ही 3 वर्षे गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो- गिरीजाची आई (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)

आम्ही विनायक राऊतांच्याही अटकेची मागणी करत आहोत. आज विनायक राऊत आरोप करत आहेत. टेरेस फ्लॅट मागितला 5 लाख मागितले. मूळात आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत होतो. विनायक ⁠राऊतांच्या घराची मुलगी आहे, आरोप करताना विचार करावा. मुलगी माहेरी आल्यापासून आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत आहोत. आम्ही 3 वर्षे गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो. आपला मुलगा काय करतो हे त्यांना माहिती आहे. विनायक राऊत यांचा मुलगा घाणेरड्या शिव्या देतो. मानसिक त्रास देतो. आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला, असं गिरीजाच्या आई म्हणाल्या. 

शारीरिक संबंध होणार नाहीत, तर मुलं होणार कशी? (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)

आम्ही पैशांची मागणी केली हे चुकीचं आहे. आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही 3 वर्षे थांबलो नसतो. राजकीय पातळी त्यांची चांगली असल्याने आम्ही काही बोललो नाही. आम्हाला फक्त मुलगी चांगली संसारी रहावी, ही इच्छा आहे. आम्ही हे सामोपचाराने मिळवण्यासाठी बोलत होतो. शारीरिक संबंध होणार नाहीत, तर मुलं होणार कशी?, असा सवालही गिरीजाच्या आईने उपस्थित केला. तसेच माझा मुलीला धमकावले जात होते फोनवर बोलतानाही फोन स्पिकरवर ठेवण्यास तिला धमकावले जात असल्याची प्रतिक्रिया गिरिजाची आई पूजा पवार यांनी दिली.

संबंधित बातमी:

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: हनिमूनमध्ये शारीरिक संबंधास नकार, मी प्रश्न विचारताच म्हणाला…; विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय?

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको…इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *