Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत


छत्रपती संभाजीनगर: मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील रहिवासी असलेल्या महेश सुरेश कुंभार (वय ३२) यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू (Moshi Building Collapse) झाला. दुर्घटनेनंतर तब्बल तीन दिवस कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महेश यांचा मृतदेह शनिवारी (Moshi Building Collapse) अखेर बचाव पथकाच्या हाती लागला. त्यांच्या विवाहाला महिनाही पूर्ण (Moshi Building Collapse) झाला नसताना काळाने हा घाला घातल्यामुळे कुंभार कुटुंबासह संपूर्ण बजाजनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.(Moshi Building Collapse)

बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱ्याचा डोंगर कोसळला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, दुर्दैवाने त्यात महेश यांचाही समावेश आहे.(Moshi Building Collapse)

Moshi Building Collapse: कुटुंबीयांची आशेची किरण मावळली

महेश हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील अयोध्यानगर येथील रहिवासी होते. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक विद्यालयात झाले होते. ‘एमबीए’ (MBA) पूर्ण केल्यानंतर त्यांनी वर्षभरापूर्वीच मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात ‘एचआर’ (HR) अधिकारी म्हणून नोकरी सुरू केली होती. बुधवारच्या दुर्घटनेनंतर मध्यरात्री कंपनी प्रशासनाने महेश इमारतीमध्ये अडकल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला दिली. ही बातमी ऐकताच त्यांचे भाऊ संतोष कुंभार तातडीने पुण्यात घटनास्थळी रवाना झाले. महेश सुखरूप बाहेर येतील, अशी आशा कुटुंबाला शेवटपर्यंत होती; मात्र शनिवारी त्यांचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांचा हा धीर सुटला.

Moshi Building Collapse: नव्या संसाराची स्वप्ने पडली भंग

महेश यांच्या आयुष्यात नुकतीच सुखद सुरुवात झाली होती. अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच २२ जून रोजी त्यांचा विवाह झाला होता. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नाला एक महिनाही पूर्ण झाला नव्हता. आपल्या पत्नीला कायमचे पुण्यात सोबत राहण्यासाठी आणायचे म्हणून त्यांनी मोशी परिसरात एक फ्लॅटही शोधून ठेवला होता. नव्या संसाराची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या महेश यांच्या आयुष्याचा नियतीने एका क्षणात अंत केला.

Moshi Building Collapse: एक उमदा आणि जबाबदार तरुण हरपला

महेश यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव सध्या पुण्यातील शासकीय रुग्णालयात असून, रविवारी अंत्यसंस्कारासाठी ते बजाजनगर येथे आणले जाणार आहे. या दुर्दैवी घटनेने केवळ कुंभार कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण बजाजनगर परिसर हादरला आहे. एका हुशार, कर्तृत्ववान आणि उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या कठीण काळात महेश यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे घरातील वडील, दोन भाऊ आणि नवविवाहित पत्नी या सर्वांची मोठी जबाबदारी महेश यांच्या खांद्यावर होती. अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि सर्वांना मदत करणारा स्वभाव हीच त्यांची ओळख होती. त्यांचे मित्र निनाद चौधरी, शाम विधाते, दीपक अंबाडे आणि कृष्णा मगर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक प्रतिक्रिया दिल्या. शालेय शिक्षणापासून ते नोकरीपर्यंतचा प्रवास एकत्र अनुभवलेला आणि सुट्टीच्या दिवशी न विसरता भेटणारा आपला मित्र आज कायमचा सोडून गेल्याची भावना त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *