Ravi Pradosh: भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस खास; रवि प्रदोष व्रताचे महत्त्व, मुहूर्त आणि पूजाविधी | अध्यात्म बातम्या


Last Updated:

Ravi Pradosh Vrat: प्रदोषकाळात भगवान शंकरांचा जलाभिषेक करून बिल्वपत्र, फुले अर्पण करावीत तसेच ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

+

भगवान

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस खास; जाणून घ्या रवि प्रदोष व्रताचे महत्त्व, मुहूर्त आणि पूजाविधी

पुणे: ज्योतिषशास्त्रात प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आज, 12 जुलैला रवि प्रदोष व्रत आले आहे. रविवारी येणारे प्रदोष व्रत भगवान शिव आणि सूर्यदेव या दोघांच्या कृपेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवांची मनोभावे आराधना, उपासना आणि प्रदोषकाळात पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होण्यास मदत होते, मानसिक शांती लाभते आणि सुख-समृद्धीचा मार्ग खुला होतो. आज आपण रवि प्रदोष व्रताचे महत्त्व, पूजा विधी आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. याविषयीची सविस्तर माहिती ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी दिली आहे.

व्रताचा मुहूर्त काय?

ज्योतिषी तृप्ती भोसले यांनी सांगितले की, भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने भगवान शंकरांची आराधना केल्यास त्यांच्या कृपादृष्टीचा लाभ होतो आणि जीवनातील अनेक संकटे दूर होण्यास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा आषाढ कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत रविवारी आल्याने त्याला रवि प्रदोष व्रत म्हटले जाते. यावर्षी त्रयोदशी तिथी 12 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 4 मिनिटांनी सुरू होऊन रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी समाप्त होणार आहे. भगवान शंकरांच्या पूजेसाठी प्रदोषकाळ हा सर्वात शुभ मानला जातो.

रवि प्रदोष व्रताची पूजा कशी करावी?

या दिवशी पूजेच्या आधी स्नान करून स्वच्छ, शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर भगवान शंकरांचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा. दिवसभर सात्त्विक आहार घ्यावा किंवा शक्य असल्यास उपवास करावा. प्रदोषकाळात भगवान शंकरांचा जलाभिषेक करून बिल्वपत्र, फुले अर्पण करावीत तसेच ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

ज्यांना सविस्तर पूजा करणे शक्य नसेल त्यांनी किमान 108 वेळा ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. याशिवाय शिव चालीसा, शिवस्तुती किंवा प्रदोष व्रत कथा वाचावी आणि भगवान शिव तसेच माता पार्वतीची आरती करावी. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले शिवपूजन मनाला शांती देते, जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत करते आणि भगवान शंकरांची कृपा लाभून सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते अशी माहिती तृप्ती भोसले यांनी दिली.

मराठी बातम्या/अध्यात्म/

Ravi Pradosh: भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस खास; रवि प्रदोष व्रताचे महत्त्व, मुहूर्त आणि पूजाविधी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *