Shani Vakri 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच न्यायदेवता म्हणतात. जेव्हा शनि देव आपली चाल बदलतो. तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. त्यानुसार, यंदा 27 जुलै 2026 रोजी शनि वक्री होणार आहे. शनि देव जवळपास 138 दिवसांपर्यंत वक्री होणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबर 2026 रोजी शनि मार्गी होणार आहे.
या दरम्यान शनि मीन राशीत वक्रीपासून संक्रमण करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दरम्यान काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मकर, कुंभ आणि मीन राशींना सावधानतेचा इशारा
सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरु आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. त्यामुळे या काळात ज्या राशींवर शनिचा प्रभाव आहे त्या राशींच्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या दरम्यान फक्त नकारात्मकच नाही तर काही राशींना सकारात्मकही परिणाम मिळतील.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
मकर रास (Capricorn Horoscope)
या कालावधीत मकर राशींच्या लोकांनी नोकरी आणि व्यवसायात कोणत्याच प्रकारची घाईगडबड करु नये. कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. घरातील ज्येष्ठांचं मत विचारात घ्या. मगच निर्णय घ्या.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी धैर्याने काम करणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी तसेच, कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद घालवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनिच्या वक्रीचा काळ हा फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला कामाचा ताण जास्त जाणवेल. सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. तसेच, कोणतंही काम करताना धैर्याने करा. विचार न करता निर्णय घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य