Why Toss Delayed of 5th match India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यापूर्वी क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी एक अजब आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. द रोझ बाऊल (The Rose Bowl) मैदानावर होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक (Toss) नियोजित वेळेवर होऊ शकलेली नाही. नाणेफेकीला उशीर होण्यामागचं कारण ऐकून सगळे अवाक झाले. भारताचा संपूर्ण संघ स्टेडियमकडे जात असताना रस्तात वाहतूक कोंडीत अडकला आहे. क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच घडणाऱ्या या घटनेमुळे साऊदॅम्प्टनच्या मैदानावर सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
The toss for the 5th T20I between India and England has been delayed at The Rose Bowl in Southampton as the Indian team is stuck in traffic. A new start time will be confirmed shortly pic.twitter.com/Ah1UTtaAdb
— IANS (@ians_india) July 11, 2026
नेमकं काय घडलं?
पाचव्या आणि निर्णायक सामन्यासाठी सज्ज होऊन भारतीय संघ आपल्या लक्झरी बसने हॉटेलमधून मैदानाकडे निघाला होता. परंतु, साऊदॅम्प्टनच्या मुख्य रस्त्यांवर अचानक झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे भारतीय संघाचा ताफा मध्यंतरीच अडकला. अनेक किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे खेळाडूंची बस जागेवरून हलणेही कठीण झाले होते. सामन्याची वेळ जवळ येत असतानाही भारतीय संघ मैदानात पोहोचू शकला नाही. अखेर नियमांनुसार, खेळाडू वेळेत उपस्थित नसल्याने आयोजकांना सामन्याची नाणेफेक तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. इंग्लंडचा संघ मैदानावर पोहोचला असून ते भारतीय संघाची वाट पाहत आहेत.
टीम इंडिया अखेर मैदानात दाखल!
साऊदॅम्प्टनच्या रस्त्यांवरील ट्रॅफिकमधून सुटून भारतीय संघाची बस अखेर सुरक्षितपणे द रोझ बाऊल स्टेडियमवर पोहोचली आहे. खेळाडू बसमधून उतरून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जातानाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर दाखवण्यात आले आहे. संघ मैदानात पोहोचताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
नाणेफेक आणि सामन्याची नवीन वेळ जाहीर!
भारतीय संघ उशिरा पोहोचल्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नवीन वेळ खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
नवीन नाणेफेक (Toss) वेळ : रात्री 07:15 वाजता (भारतीय वेळ)
सामना सुरू होण्याची वेळ: रात्री 07:30 वाजता (भारतीय वेळ)
🚨 Update 🚨
Toss at 7.15 PM IST (2:45 PM local time).
Start of play at 7.30 PM IST (3 PM local time).#TeamIndia | #ENGvIND
— BCCI (@BCCI) July 11, 2026
हे ही वाचा –