Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील सातारा (Satara) जिल्ह्यातून एक संभ्रमात टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. माण तालुक्यातील मोही गावात एका शेतकऱ्याने (Farmer) चक्क शेकडो लिटर दुधाने (Milk) भरलेले कॅन थेट रस्त्यावर ओतून दिले आहेत. या विचित्र घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, यामागे कडक अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कारवाईची धास्ती तर नाही ना, अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धसका आणि प्रशासनाच्या कारवाईची भीती?
सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) दुधातील भेसळखोरांविरुद्ध (Adulteration) अत्यंत तीव्र मोहीम राबवली जात आहे. ‘आयएएस’ अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीची आणि धडक कारवाईची सर्वांनाच माहिती आहे. मोही गावात प्रशासनाची अचानक धाड पडणार, या भीतीनेच संबंधित शेतकऱ्याने हे भेसळयुक्त दूध रस्त्यावर ओतून देऊन पुरावा नष्ट केल्याचा दावा सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे.
Satara News: दूध खराब झाल्याने ओतले, शेतकऱ्याचा दावा
या व्हायरल व्हिडिओनंतर जेव्हा संबंधित शेतकऱ्याकडे या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा त्याने सोशल मीडियावरील सर्व दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. “रस्त्यावर ओतलेले दूध भेसळयुक्त नव्हते, तर ते खराब झाले असल्यामुळेच नाईलाजाने मला ते रस्त्यावर ओतून द्यावे लागले,” असे स्पष्टीकरण या शेतकऱ्याने दिले आहे.
Satara News: एकाच वेळी शेकडो लिटर दूध खराब कसं होणार? नागरिकांचा सवाल
शेतकऱ्याने दूध नासल्याचे किंवा खराब झाल्याचे कारण दिले असले तरी, स्थानिक नागरिक आणि नेटकऱ्यांचे मात्र या स्पष्टीकरणाने समाधान झालेले नाही. “एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजेच शेकडो लिटर दूध अचानक खराब कसे होऊ शकते?” असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हे दूध खरोखरच नासले होते, की प्रशासकीय कारवाईच्या भीतीने ते जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले, याचे गूढ अद्याप कायम आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ