कांदिवली विद्यार्थिनी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस तपासात डिलिव्हरी बॉयच्या प्रेमाचा विकृत चेहरा समोर – Marathi News | Kandivali minor student killing case 22 year old delivery boy Suraj Waghmare reveals motive behind killing the girl


मुंबईच्या कांदिवलीत एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा धागा लागला आहे. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर हत्येची कबुली देत धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी डिलिव्हरी बॉयचे काम करत असल्याचे तपासात उघड झालं आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीने संशयाच्या कारणावरून ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज वाघमारेला अल्पवयीन विद्यार्थिनीवर संशय होता. तो मुलीच्या फोनमधून अनेक मुलांचे नंबर डिलीट करायचा. त्यानंतर त्यांना ब्लॉक करायला लावायचा. आरोपी विद्यार्थिनीला इतर मुलांशी बोलण्यास मज्जाव करत होता. इतकेच नाही तर सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपीने याआधीही मुलीला मनवण्यासाठी आत्महत्येचे नाटक केले होते.  त्याने संशयाच्या भरात रागाच्या भरात विद्यार्थिनीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. सध्या पोलीस आरोपीकडे अधिक चौकशी करत आहेत. केवळ संशयापोटी झालेल्या या निर्घृण हत्येने संपूर्ण कांदिवली हादरली आहे

त्या दिवशी काय घडलं?

कांदिवलीतील तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केली. त्याने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह कांदिवली पूर्वेतील दामूनगर सातारा कॅम्पजवळील जंगल परिसरात फेकला. मृत विद्यार्थिनीच्या पोस्टमार्टममधून तिच्या चेहऱ्यावर 16 हून अधिक वार करून हत्या केली. या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा तपास केला. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं. सूरज वाघमारे असे 22 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो कांदिवलीच्या दामूनगर भागाील लहूगड येथील सरस्वती चाळचा रहिवासी आहे. तो प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. तो अल्पवयीन विद्यार्थिनीला आत्महत्येची धमकी द्यायचा. तसेच तिला मानसिक त्रास देखील द्यायचा. त्याच्या कृत्याला त्याच्या परिसरातील इतर मुली देखील वैतागल्या होत्या. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *