आधी समोशासाठी लोको पायलटने ट्रेन थांबवली, आता पठ्ठ्याने शेवपुरीसाठी 20 मिनिटं बस थांबवली, मुंबईतला धक्कादायक प्रकार | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Viral Video : सोशल मीडियावर सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित दोन वेगवेगळे व्हिडिओ जोरदार चर्चेत आहेत. एका ठिकाणी बसचालकाच्या कृतीची चर्चा रंगली, तर दुसऱ्या घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित झाले. दोन्ही प्रकरणांनंतर संबंधित प्रशासनाने चौकशी सुरू केली.

बाप रे! भुकेचा असा कसा अट्टाहास?
बाप रे! भुकेचा असा कसा अट्टाहास?

मुंबई : भूक लागणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. बऱ्याचदा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तर आवडीच्या पदार्थांसाठी माणसे कोणत्याही थराला जातात. पण जेव्हा सार्वजनिक सेवेतीलच जबाबदार असलेले व्यक्तीच आपल्या खाण्याच्या नादात शेकडो प्रवाशांना वेठीस धरतात, तेव्हा मात्र एक अजब आणि संजापनजक गोष्टी समोर येतात. अशीच सध्या…

प्रकरण काय?

सध्याच सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी चालवण्यात येणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही चालकांच्या खाण्याच्या आवडीमुळे चर्चेत आलेली आहे. जिथं मुंबई शहर आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे चालकांच्या बेजबाबदारपणाचे दोन अजब प्रकार समोर आलेले आहेत. ज्या घटनेचे दोन्हीही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मुंबईत अचानक काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना ही मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरातील आहे. जिथं लोकांची गर्दी आणि वाहतूकीचा गोंधळ असलेल्या एम.जी. रोडवर एका मुजोर बेस्ट बसचालकाने फक्त आणि फक्त स्वत:साठी शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी भररस्त्यात बस उभी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकार त्याने ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी केला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते त्या वेळेस खाद्यपदार्थ हातात मिळेपर्यंत चालकाने ही बस तब्बल 20 मिनिटे जागची हलवली नव्हती. या प्रकारामुळे बसच्या मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेव्हा एक व्यक्ती त्याला जाब विचारण्यासाठी आला असता, चालकाने त्यांना अत्यंत चुकीच्या भाषेत प्रतिक्रिया दिलीली आहे. जेव्हा या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा म्हाडा आणि बेस्ट प्रशासनाने आगारप्रमुखांना कडक कारवाईचे आदेश दिले.

मात्र आगाराच्या असलेल्या संगणक प्रणालीत बस केवळ फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटे थांबल्याची नोंद समोर आलेली आहे. मात्र तरीही याचा प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, आणखी एका ठिकाणी…

असचा दुसरा अजून एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये समोर आलेला आहे. जिथं तर बसतालकापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत रेल्वेच्या लोको पायलटने चक्क समोसे घेण्यासाठी रेल्वे गाडी थांबवलेली आहे. इंदूर आणि महू या दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमधून चक्क लोको पायलट खाली उतरला आणि त्याने रेल्वे फाटकाजवळील दुकानातून समोसे खरेदी केले आणि तो आल्यावरच ट्रेन परत पुढे रवाना झाली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही स्थानिक नागरिकांच्या मते हा लोको पायलट रोज समोसे खाण्यासाठी ट्रेन थांबवतो, ज्यामुळे ट्रेनला दररोज 10 मिनिटे उशीर होतो. काही नागरिकांना या प्रकाराचा व्हिडिओ ही मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

आधी समोशासाठी लोको पायलटने ट्रेन थांबवली, आता पठ्ठ्याने शेवपुरीसाठी 20 मिनिटं बस थांबवली, मुंबईतला धक्कादायक प्रकार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *