7000mAh बॅटरी अन् 50MP सोनी सेन्सर असलेला फोन लाँच, वनप्लस व आयक्यूओओ स्मार्टफोनला देणार दमदार टक्कर – Marathi News | Phone with 7000mAh battery and 50MP Sony sensor launched set to give tough competition to OnePlus and iQOO smartphones


मोटोरोला कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये त्यांचा नवीन Moto G77 Power स्मार्टफोन लाँच केला आहे. तसेच कंपनीच्या जी सीरीजमधील या नवीन फोनची विक्री पुढील आठवड्यात सुरू होईल. या स्मार्टफोनच्या फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी कंपनीच्या दाव्यानुसार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 59 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते. याव्यतिरिक्त या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 सीरीज प्रोसेसर, 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स याबद्दल जाणून घेऊयात.

या नवीन मोटोरोला स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असून या व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रूपये असेल. कंपनीने अद्याप 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत जाहीर केलेली नाही, परंतु या फोन खरेदीवर ग्राहकांना 2 हजार रूपयांची कार्ड सवलत मिळेल असे सांगण्यात आले आहे. Moto G77 Power च्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाल्यास, याची विक्री 13 जुलैपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर सुरू होईल.

हा फोन तुम्हाला Pantone Impenetrable, Pantone Fuchsia Red, Pantone Nautical Blue आणि Pantone Laurel Green या रंगांमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीच्या रेंजमध्ये हा नवीन मोटोरोला फोन IQOO Z11x 5G, Samsung Galaxy A26 5G आणि OnePlus Nord CE6 Lite सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

Moto G77 Power स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या फोनमध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी टचस्क्रीन असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, टच सॅम्पलिंग रेट 120Hz पर्यंत आणि कमाल ब्राइटनेस 1050 nits पर्यंत आहे. कंपनीचा दावा आहे की, या हँडसेटला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग मिळाले आहे.

ओएस: हा ड्युअल-सिम मोटोरोला फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हॅलो यूआयवर चालतो.

चिपसेट : वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये 6nm वर बनवलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 ऑक्टा कोअर प्रोसेसर, तसेच उत्तम ग्राफिक्ससाठी ARM माली G57 MP2 GPU देण्यात आला आहे.

कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी LYT-600 सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. यात 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून, हा फोन 2K/30fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

बॅटरी: या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 30W वायर्ड चार्जिंग आणि 6W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *