कॅमेऱ्यामधील मेगापिक्सेलसह Optical आणि Digital झूम देखील महत्वाचे, जाणून घ्या कोणतं फिचर आहे बेस्ट – Marathi News | Megapixels alone are not enough to take good photos with a camera optical and digital zoom are also important


नवीन मोबाईल खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकजण कॅमेऱ्याच्या मेगापिक्सेलचा विचार करतो. पण त्यासोबत फोनमध्ये असलेले झूमचे फिचर्स देखील तितकेच महत्त्वाचे आहे. काही कंपन्या दावा करतात की त्यांचे फोन 3x, 10x, किंवा अगदी 50x झूमला सपोर्ट करतात. पण तुम्हाला माहित आहे का की झूमचे किती वेगवेगळे प्रकार आहेत? फोनमधील कॅमेऱ्या फिचर्समध्ये ऑप्टिकल झूम आणि डिजिटल झूम हे दोन प्रकारचे झूम उपलब्ध असतात. त्यामुळे फोन खरेदी करण्यापूर्वी मेगापिक्सेलसोबतच झूमचाही विचार करा. चला तर मग आजच्या लेखात आपण फोनमधील कॅमेऱ्याचे मेगापिक्सेल आणि झुम फिचर्स यामधील फरक जाणून घेऊयात.

ऑप्टिकल झूम म्हणजे काय?

ऑप्टिकल झूम म्हणजे कॅमेऱ्याच्या लेन्सला ॲडजस्ट करून एखाद्या फोटो काढत असलेल्या गोष्टीला झुम करून जवळ आणणे, जेणेकरून त्या फोटोची क्वॉलिटी खराब व्हायला नको. ही टेक्नॉलॉजी दृश्य मोठे करण्यासाठी कॅमेऱ्याच्या आतील लेन्सच्या घटकांच्या हालचालीवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही फोटोची डिटेल किंवा क्लॅरिटी झूम इन करू नीट प्रकारे पाहू शकता, तेव्हा तुम्ही ऑप्टिकल झूम वापरत आहात.

आजकाल बहुतेक स्मार्टफोन्स झूम केल्यावर फोटोची गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑप्टिकल झूमचा वापर करतात. तथापि अनेक फोन्समध्ये तुम्हाला डिजिटल झूमचे फिचर्स मिळू शकतात, म्हणून फोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला आवडणाऱ्या फोनमध्ये डिजिटल झूम आहे की ऑप्टिकल झूम आहे, हे ठरवण्यासाठी थोडे तुम्हाला रिचर्स करावे लागेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ऑप्टिकल झूम दूरच्या वस्तूंना जवळ आणतो आणि प्रतिमेची गुणवत्ता सुधारतो.

डिजिटल झूम म्हणजे काय?

ऑनरच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ऑप्टिकल झूममध्ये एखाद्या वस्तूला मोठं दाखवण्यासाठी लेन्सला ॲडजस्ट करून डिजिटल झूममध्ये तो फोटो क्रॉप करून फोटोच्या मधला भाग मोठा करून काम केले जाते. या प्रक्रियेत गायब डिटेल्स झालेले तपशील भरण्यासाठी सॉफ्टवेअर अल्गोरिदमचा वापर केला जातो, ज्यामुळे कधीकधी फोटोची क्वॉलिटी कमी होऊ शकते, विशेषतः जास्त झूम असते. डिजिटल झूमचा फायदा हा आहे की त्यासाठी अवजड लेन्सची आवश्यकता नसते, ज्यामुळे डिव्हाईस अधिक पातळ आणि कॉम्पॅक्ट बनू शकतात.

ऑप्टिकल झूम विरुद्ध डिजिटल झूम: फरक काय आहे?

हे कसे काम करते: ऑप्टिकल झूम फोटोच्या गुणवत्तेशी तडजोड न करता फोन फोटो लेन्सची फोकल लांबी बदलते. ऑप्टिकल झूम फोटोची एकूण फोटोची गुणवत्ता सुधारते. डिजिटल झूम प्रतिमेच्या मध्यभागाला डिजिटल पद्धतीने मोठे करते, ज्यामुळे अनेकदा स्पष्टता कमी होते.

फोटोची गुणवत्ता: ऑप्टिकल झूम जास्त मॅग्निफिकेशन लेवलवरही फोटोची चांगली गुणवत्ता टिकवून ठेवते. डिजिटल झूम फोटोमधील डिटेल्स आणि क्लॅरिटी कमी करू शकतो.

हार्डवेअर: ऑप्टिकल झूम हे कॅमेऱ्याच्या भौतिक हार्डवेअरचे एक वैशिष्ट्य आहे, ज्यासाठी लेन्सच्या काही भागांची हालचाल होत असते. डिजिटल झूम हे एक सॉफ्टवेअर वैशिष्ट्य आहे जे कॅमेऱ्याच्या हार्डवेअरवर अवलंबून नसते.

उपयोग: ऑप्टिकल झूमचा वापर ॲडव्हांस फोटोग्राफी फिचर्स असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये आणि स्मार्टफोन्समध्ये केला जातो. याउलट, डिजिटल झूम स्वस्त डिव्हाइसमध्ये सामान्यपणे वापरला जातो आणि तो जवळजवळ सर्व डिजिटल कॅमेऱ्यांमध्ये आणि स्मार्टफोन्समध्ये आढळतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *