Aadesh Bandekar Puja Birari: ‘कोणालाच कळू दिलं नाही तू अन् सोहमने..’ वारीच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी घेतली पूजाची फिरकी; मग पूजाही म्हणाली ..; video


Aadesh Bandekar Puja Birari: महाराष्ट्राचे लाडके आदेश भाऊजी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय आहेत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेते दिग्दर्शक व निर्माते आदेश बांदेकर सासरे झाले आहेत. त्यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचं लग्न झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही आदेश बांदेकर पंढरपूरची वारी करत आहेत त्यांच्या youtube चॅनलवरून केलेल्या vlogमध्ये ते वारीला निघाल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची सून पूजा बिरारीही होती. वारीच्या प्रवासादरम्यान दोघांमध्ये झालेल्या एका संवादाची सध्या एकच चर्चा रंगली आहे. एकमेकांसोबत गप्पा मारत, एकमेकांचे आषाढी वारीतले अनुभव आणि विठ्ठल भक्ती विषयी बोलताना आदेश बांदेकरांनी सुनेची फिरकी घेतली. त्यावर पूजा बिरारीनेही हसत हसत उत्तर दिलं. 

‘कोणालाच कळू दिलं नाही तू अन् सोहमने ..’

वारीच्या प्रवासात आदेश बांदेकर आणि पूजा बिरारी एकमेकांशी आणि प्रेक्षकांची गप्पा मारत संवाद साधत निघाले आहेत. यावेळी आषाढी वारीचा अनुभव विचारताना आदेश बांदेकरांनी अभिनेत्री आणि सून पूजा बिरारीची फिरकी घेतली. ते म्हणाले ‘गेल्या वर्षी मी त्या वारीत होतो. पांडुरंगाच्या भक्तीच्या नामामध्ये, ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊलीच्या गजरात मी रंगून गेलो होतो.त्यावेळेला तिथे सगळं युनिट होतं.पण त्यावेळी तू आणि सोहमने कोणालाही कळू दिलं नाही . हे कसं काय जमवलं तुम्ही?’ या प्रश्नावर पूजा बिरारीनेही हसत हसत उत्तर दिलं. ती म्हणाली ‘ मला असं नाही वाटत. सगळ्यांना खरंतर कल्पना होती. ती गोष्ट आपण कुणाला तशी सांगितली नव्हती. वारीचा प्रवासातला हा मजेशीर संवाद सध्या प्रेक्षकांनाही आवडलाय.

 

आदेश बांदेकर यंदा वारीचा आनंद घेणार असले तरी कामाच्या व्यापात व्यस्त असल्यामुळे अभिनेत्री पूजा बिरारीला यंदाची वारी करता येणार नाहीये. मात्र तरीही पुण्यापर्यंत ती सासरे आदेश बांदेकर यांना सोडण्यासाठी आणि माहेरी आईबाबांना भेटण्यासाठी आली. वारीत सहभागी होता येत नसलं तरी, तिने आदेश बांदेकर यांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदेश विश्व या यूट्यूब चॅनलवर त्यांचा नवा Vlog सध्या चर्चेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *