सांगलीत संतापजनक घटना! मध्यरात्री घरात घुसून दागिने लुटत नात जावयानेच वृद्ध महिलेला पेटवलं, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू


Sangli Crime News :  सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेटफळे गावातील एका वृद्ध महिलेला नात जावयाने आर्थिक कारणातून पेटवून दिले आहे. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांकडून आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. 

 संशयित राजेश दिलीप गायकवाड या नात जावयास पोलिसांनी अटक केली 

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे 83 वर्षीय मालन दिलीप जाधव या महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून दागिने लुटत पेटवून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू  झाला होता. संशयित राजेश दिलीप गायकवाड या नात जावयास पोलिसांनी अटक केली आहे. गायकवाड याने प्रॉपर्टीच्या आर्थिक फायद्यासाठी खून करून लुटीचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *