Guru Aditya Rajyog 2026 : द्रिक पंचांगानुसार, 16 जुलै 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे संक्रमण गुरुवारच्या दिवशी होणार आहे. तसेच, ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हे फार शुभ मानलं जातं. कर्क राशीत देवतांचा गुरु ग्रह बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहे. अशात कर्क राशीत सूर्य आणि गुरु ग्रहाच्या या युतीपासून गुरु-आदित्य राजयोग हा एक दुर्लभ संयोग मानला जातोय.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहाला मान-सन्मान आणि आत्म्याचा कारक ग्रह मानला जातो. तर गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. जेव्हा दोन्ही महाग्रहांची युती होते तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळतो. त्यामुळे या राजयोगाने कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
गुरु आदित्य राजयोगाच्या चौथ्या चरणात हा संयोग जुळून येणार आहे. या काळात जर तुम्हाला नवीन वाहनाची खरेदी करायची असेल तर हा चांगला योग आहे. तसेच, तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करु शकता. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्याचं संक्रमण याच राशीत होणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. मात्र, तुम्ही आत्मविश्वासाने त्या पार पाडाल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या अकराव्या चरणात गुरु आदित्य राजयोग निर्माण होणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. तसेच, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सरकारी योजनांचा लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या पाचव्या चरणात ही युती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी फार शुभ मानला जाणार आहे. तुमचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता नक्की मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Panchank Yog 2026 : पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला ‘या’ गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा…