OYO हॉटेलमध्ये मोठं कांड, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची रात्रभर नशा, सकाळचं दृश्य पाहून पोलिसही हादरले! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

ओयो हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता चेकइन केलं, यानंतर दोघांनी रात्रभर दारू प्यायली, पण सकाळी हॉटेलच्या रूममध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

OYO हॉटेलमध्ये मोठं कांड, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची रात्रभर नशा, सकाळचं दृश्य पाहून पोलिसही हादरले!
OYO हॉटेलमध्ये मोठं कांड, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची रात्रभर नशा, सकाळचं दृश्य पाहून पोलिसही हादरले!

मुंबई : ओयो हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता चेकइन केलं, यानंतर दोघांनी रात्रभर दारू प्यायली, पण सकाळी हॉटेलच्या रूममध्ये जे दृश्य दिसलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. गर्लफ्रेंडच्या समोरच बॉयफ्रेंडने आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेलच्या रूममध्येच बॉयफ्रेंडने स्वत:ला गळफास लावून घेतला. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोघंही हॉटेलच्या रूममध्ये गेले आणि त्यानंतर दोघांनी भरपूर दारू प्यायली, यानंतर दोघांमध्येही वाद झाले. गर्लफ्रेंड नशेमध्येच झोपली होती, तेव्हा बॉयफ्रेंडने स्वत:चं आयुष्य संपवलं. मृत्यू झालेला मुलगा 19 वर्षांचा असून त्याचं नाव शादाब शेख असल्याचं समोर आलं आहे.

सकाळी गर्लफ्रेंड शुद्धीत आली तेव्हा तिला शादाब लटकलेल्या अवस्थेत आढळला, यानंतर तिने स्वत: त्याला उतरवलं, यानंतर तिने मित्रांना बोलवून शादाबला खाजगी रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी शादाबला मृत घोषित केलं. छत्तीसगडच्या भिलई भागातील स्मृती नगर भागात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

शादाबच्या कुटुंबाचे मुलीवर आरोप

शादाबच्या कुटुंबाने मात्र मुलीने शादाबची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मुलीने शादाबला बेल्टने मारलं आणि मग स्वत:चा हात आणि गळा ब्लेडने कापून त्याला धमकवलं. शादाबची हत्या करून ती रात्रभर बॉडीसोबत राहिली, असा आरोप शादाबच्या भावाने केला आहे. शादाबच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार शादाबचं त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं होतं, तसंच त्याने जुन्या गर्लफ्रेंडला मोबाईल आणि सोशल मीडियावरूनही ब्लॉक केलं होतं, यानंतर तो नव्या गर्लफ्रेंडला डेट करत होता.

हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

शादाब हा संगीत कलाकार होता आणि पियानो वाजवायचा. शादाबचं कुटुंब आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांनी केलेला शादाबने स्वत:च आयुष्य संपवल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ‘सहा महिन्यांपासून तो या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मंगळवारी शादाब त्याच्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये गेला. तिथे त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. रात्री 11.30 वाजता शादाबचे मित्र हॉटेलमध्ये गेले, तेव्हा तो चेकआऊट करणार होता, पण रूमचा दरवाजा उघडला गेला नाही. मित्रांनी 2-3 तास वाट पाहिली, तरीही रूम उघडली जात नव्हती, अखेर सकाळी 6 वाजता तरुणी रूममधून बाहेर आली आणि पुन्हा रूममधये गेली. ही पूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमधून समोर आली आहे’, असं शादाबचा भाऊ अल्ताफ शेख म्हणाला आहे.

सकाळी साडेआठ वाजता शादाबचे मित्र पुन्हा एकदा हॉटेल रूमवर पोहोचले पण तरीही दरवाजा उघडला गेला नाही. यानंतर गर्लफ्रेंडने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा शादाबचा मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत होता, पंख्याला स्कार्फ लटकलेला होता. शादाब असं पाऊल उचलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शादाबच्या भावाने दिली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पुढच्या तपासानंतरच कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे.

मराठी बातम्या/देश/

OYO हॉटेलमध्ये मोठं कांड, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडची रात्रभर नशा, सकाळचं दृश्य पाहून पोलिसही हादरले!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *