IAS Transferred: राज्यातील ८ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा मोठा निर्णय | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Maharashtra IAS Transferred: महाराष्ट्र शासनाने ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर सामान्य प्रशासन विभागाने या बदल्यांचे अधिकृत आदेश काढले आहेत.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय

मुंबई : राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. ८ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि महानगरपालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील बदल्यांची परंपरा कायम राहिली आहे.

कोणाची कुठे झाली बदली?

१. रुपेश जयवंशी (IAS:२००९)

पुणे येथील ‘महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे’ व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईतील ‘महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या’ व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

२. श्रीधर दुबे (IAS:२०१४)

यापूर्वी १९ मे २०२६ रोजी त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला होता, त्यात अंशतः बदल करण्यात आला आहे. आता श्रीधर दुबे यांची नवी मुंबई येथील ‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (NRLM) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

३. निलेश सागर (IAS:२०१५)

नवी मुंबईच्या ‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (NRLM) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची आता पुणे येथील ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या’ आयुक्तपदी बदली झाली आहे.

४. जगदीश मिनीयार (IAS:२०१५)

पुण्याचे महिला व बालकल्याण आयुक्त जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोचे (CIDCO) मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. श्रीमती वर्षा लड्डा (IAS:२०१५)

अमरावती महानगरपालिकेच्या महिला महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची पुण्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

६. डॉ. मंगेश गोंदवले (IAS:२०१५)

गेल्या २३ जून २०२६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात बदल करून, डॉ. मंगेश गोंदवले यांची आता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

७. पंकज देवरे (IAS:२०१६)

मुंबईतील ‘महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे’ सचिव पंकज देवरे यांची एमएमआरडीए (MMRDA) मुंबई येथे ‘सह महानगर आयुक्त’ (Joint Metropolitan Commissioner) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बदली झाली आहे.

८. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:२०१६)

पुण्याच्या ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या’ आयुक्त डॉ. मंजिरी मानोलकर यांची पुणे येथील ‘महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या’ व्यवस्थापकीय संचालकपदी (MD) वर्णी लागली आहे.

दरम्यान, आगामी काळातील प्रशासकीय आव्हाने आणि विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *