Hardik Pandya : मुंबई इंडियन्स हरल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्यावर बीसीसीआयकडून कारवाई, नेमकं काय कारण?


Hardik Pandya fined News : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात केकेआरने विजय मिळवला. मुंबईसाठी हा सीझन खराब ठरला. सामना झाल्यावर हार्दिक पंड्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने कारवाई केली आहे.

Hardik Pandya
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बुधवारी झालेल्या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळी बेल्स उडवल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला सामना मानधनाच्या दहा टक्के दंड झाला; तसेच एका दोषांकाचीही शिक्षा झाली. क्रिकेट साहित्याचा अवमान केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई झाली.

डावाच्या दहाव्या षटकाच्या वेळी ‘रन-अप’साठी परत जात असताना हार्दिकने यष्टींना जोरदार मारले. त्यामुळे बेल्स खाली पडल्या. यामुळे हार्दिकवर कारवाई करण्याचा निर्णय झाला. हार्दिकने त्याची चूक मान्य केली. आयपीएल नियमानुसार चार ते सात दोषांक झाल्यास खेळाडू एका सामन्यास मुकतो. दरम्यान, मुंबई इंडियन्सला बुधवारी मध्यरात्री संपलेल्या या सामन्यात हार पत्करावी लागली. हार्दिक खेळाडू म्हणूनही अपयशी ठरला. मोक्याच्या वेळी डावास स्थैर्य देणे त्याला जमले नाही. त्याला विकेटही मिळाली नाही. हार्दिकने पराभवासाठी फलंदाजीतील अपयशास जबाबदार धरले.
Maharashtra TimesYuzi Chahal: ‘तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकल्यानंतर, माझं आयुष्य पूर्णपणे बदललं’; युझीने हरलीनला मनातलं सगळं सांगून टाकलं
‘आमच्याकडून किमान २० धावा कमी झाल्या. पॉवरप्लेमध्ये आम्ही खूपच जास्त विकेट गमावल्या. तिलक वर्माची आणि माझी जोडी जास्त जमली असती, तर या धावा नक्की झाल्या असत्या,’ असे त्याने सांगितले. त्याने खेळपट्टीवर टीका करण्यास नकार दिला. ‘गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळायला मी तयार असतो. आयपीएलमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढत आहे. गोलंदाज निराश होत आहेत. या परिस्थितीत गोलंदाजांना साथ देणारी परिस्थिती असेल तर चांगलेच असते,’ असे तो म्हणाला.
Maharashtra TimesSRH vs RCB : विराट कोहलीच्या आज ५८ धावा अन् आयपीएलमध्ये रचला जाणार इतिहास; गेल, राहुल वॉर्नर सगळेच पडणार मागे

झेल सुटल्यावर हार्दिकच्या टाळ्या

मुंबई इंडियन्स संघाचे पुन्हा नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या सहकाऱ्यांच्या खराब क्षेत्ररक्षणाने कमालीचा निराश झाला. त्यातच त्याच्या गोलंदाजीवर झेल सुटल्यावर त्याने टाळ्या वाजवल्या. दहाव्या षटकात रोवमन पॉवेलने हार्दिकच्या गोलंदाजीवर चेंडू उंच मारला, तो सीमारेषेवर असलेल्या दीपक चहर आणि रॉबिन मिंझ यांच्या मध्ये पडला. दोघांनीही झेलचा प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांकडे पाहिले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याचा दोष असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. ते पाहून चिडलेल्या हार्दिकने टाळ्या वाजवल्या. सामन्यानंतर त्याने या मोसमात आम्हाला खराब क्षेत्ररक्षणाचा चांगलाच फटका बसला असल्याचे सांगितले. ‘का माहिती नाही; पण या मोसमात आमचे क्षेत्ररक्षण खूपच खराब झाले. हे घडावे अशी कोणाचीही इच्छा नसते; पण चुका झाल्या हे तर स्वीकारायलाच हवे,’ असे त्याने सांगितले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा