Arya Babbar On Prateik Smita Patil : राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रतीक स्मिता पाटीलबद्दल संताप व्यक्त केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – राज बब्बर यांचा मुलगा आणि अभिनेता आर्या बब्बर सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत असून त्यानं आपल्या वडिलांचे स्मिता पाटील यांच्यासोबतचे प्रेमसंबंध आणि रेखा यांच्याबद्दलचे आकर्षण यावर भाष्य केलं आहे. त्यानं आपला सावत्र भाऊ प्रतीकच्या वागणुकीबद्दलही भाष्य केलं. आर्या बब्बर म्हणाला की, तो प्रतीकला नेहमीच लहान भाऊ मानायचा आणि त्याच्याबद्दल त्याला प्रेम होतं, पण प्रतीकनेच कुटुंबाशी संबंध तोडले. आर्यने प्रतीकवर त्याचे वडील राज बब्बर यांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांचा गैरफायदा घेतल्याबद्दल टीकाही केली. आर्या बब्बर म्हणाला की, जेव्हा पैशांची गरज असते, तेव्हा त्याला वडील आठवतात आणि जेव्हा आदराचा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला वडील दिसत नाहीत.
प्रतीकबद्दल काय म्हणाला आर्य बब्बर ?
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत, आर्य बब्बर म्हणाला की, ‘माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे, मात्र त्यानं नातंच तोडलं. तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये कुटुंबाचा भाग म्हणून हजर राहिला आहे. इतकंच नाही, तर तो माझी स्टँडअप कॉमेडीसुद्धा पाहायला आला होता. त्यानं माझं कौतुक केलं आहे. आता तो पूर्णपणे वेगळं का वागत आहे, हे समजत नाही.’
देऊळ बंद २ वेळी पायात बाभळीचा काटा रुतला, पाय बधिर झाला; मोहन जोशींनी किस्सा सांगितला
पैशांसाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी वडील पाहिजे असतात
‘जेव्हा तुमचं करिअर व्यवस्थित सुरू नसतं, ज्यावेळी तुम्हाला खर्चासाठी वडिलांकडून पैसे हवे असतात, पॉकेट मनी पाहिजे असतो, तेव्हा ते तुमचे वडील असतात. स्मिता माँसाठी वडिलांनी जे घर बांधलं होतं, त्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे, तेव्हा ते तुमचे वडील आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला सगळे फायदे मिळत असतात, तेव्हा ते तुमचे वडील असतात. मात्र, समाजात त्यांना मानसन्मान देण्याची वेळ येते, तेव्हा ते तुमचे वडील नसतात.’ असंही आर्यने पुढे सांगितलं. Zee Marathi Serial : ‘कृष्णाईच्या लेकी’ मध्ये स्टार प्रवाहच्या अभिनेत्रीची वर्णी, ‘झी मराठी’ च्या नव्या मालिकेची तारीख आणि वेळही जाहीर
आर्य पुढे म्हणाला की, ‘जर मोठा भाऊ म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीत असेन, तर तो जेव्हा चुकेल तेव्हा मी त्याला चुकासुद्धा सांगेन. माझे वडील स्मिता माँसाठी आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेले होते, त्याच स्मिता माँचा मुलगा वडिलांना वडील मानत नाही, ही खूप वाईट गोष्ट आहे. जो मुलगा त्यांना आधी वडील मानायचा, तो आता त्यांना वडील मानत नाही, यासारखी मोठी दु:खाची गोष्ट काय असू शकते.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा