Panchank Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या दरम्यान जुळून येणारा कोण आणि दृष्टी ही फार प्रभावशाली मानली जाते. येत्या 22 जुलै 2026 रोजी साहस, ऊर्जा आणि क्रोधाचा कारक मंगळ ग्रह अध्यात्म, कल्पना आणि रहस्याचा नेप्चुन ग्रह याच्याशी 72 डिग्री अंतरावर येणार आहे. खगोलशास्त्रात याला पंचांक योग म्हणतात. यामुळे या काळात काही राशींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत तुमच्या आर्थिक आणि व्यवसायिक बाबतीत चढ-उतार जाणवतील. शेअर मार्केट किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवू नका. धनहानी होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात कोणावरही डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. तुमच्या बोलण्यात पारदर्शकता ठेवा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी देखील या काळात सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच, शत्रूंवर नजर ठेवावी लागेल. खाण्या-पिण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. या कालावधीत वाहन चालवताना काळजी घ्या. कोणत्याही नवीन योजना या काळात राबवू नका.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार सतर्कतेचा असणार आहे. या कालावधीत कोणताही मानसिक ताण घेऊ नका. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी 10 वेळा विचार करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचं मत विचारात घ्या. तुमच्या वाणीवर तसेच रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ धोक्याचा मानला जातोय. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. अचानक तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तुमचा बजेट कोलमडू शकतो. अनेक सुख-सुविधांपासून तुम्ही वंचित राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Shani Dev: मकर, कुंभ राशींचे कष्ट संपले, शेवटच्या 5 महिन्यात श्रीमंतींचे योग, शनि ‘अशी’ भरभराट करणार की, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न…