Shukra Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धन, वैभव आणि सुख-समृद्धीचा कारक शुक्र ग्रह येत्या 16 जुलै 2026 रोजी सिंह राशीत असून मघा नक्षत्रातून निघून पूर्वफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी स्वत: शुक्र देव आहे. जेव्हा एखादा ग्रह आपल्या नक्षत्रात संक्रमण करतो तेव्हा त्याची शक्ती दुप्पट होते. तसेच, हा अत्यंत शुभ कालावधी असतो. शुक्राचं आपल्याच नक्षत्रात येणं काही राशींसाठी भाग्याचं ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या कामाला गती मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची संधी आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
शुक्राच्या या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसतील. समाज आणि कार्यक्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. तुमच्या भौतिक सुख समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या ओळखी तसेच, नवीन लोकांशी संपर्क वाढतील. करिअरची एक नवीन उंची गाठाल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्ही लाभ घ्याल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. अनेक नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमच्या कल्पनाशक्तीला चांगली गती मिळेल. तसेच, या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?