Vasai Virar Rain News: नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ; 3 दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क गायब, वसई-विरारमधील हादरवणारी परिस्थिती


Vasai Virar Rain News वसई: वसई-विरार परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Vasai Rain News) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये अजूनही पाणी साचले असून काही भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्न आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीज नसल्याने अनेक घरांतील पिण्याच्या पाण्याचा साठा संपला असून काही ठिकाणी नागरिकांना टेरेसवरून पडणारे पावसाचे पाणी वापरण्याची वेळ आली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, या आपत्कालीन परिस्थितीचा काही दुकानदार आणि रिक्षाचालक गैरफायदा घेत असून जीवनावश्यक वस्तू आणि प्रवासासाठी अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

आमच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये, नागरिकांची तीव्र भावना- (Vasai Flood Marathi News)

पावसामुळे वाहतूक आणि संपर्क व्यवस्था कोलमडल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे नोकरी टिकेल की नाही, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे. मोबाईल नेटवर्कही अनेक भागांत खंडित झाल्याने बाहेरील जगाशी संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासन आणि राज्य सरकारकडे तातडीने मदत, वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. काही संतप्त नागरिकांनी, “सरकारने आम्हाला मूलभूत सुविधा द्याव्यात; आमच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये,” अशा तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असून प्रशासनाने बाधित भागांमध्ये तातडीने मदतकार्य, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि नागरिकांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

वसई आणि विरारमधील संपूर्ण वाहतूक व्यवस्थाही कोलमडली- (Vasai Virar Rain)

पूरपरिस्थितीमुळे वसई आणि विरारमधील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रिक्षा, एसटी आणि पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना बाहेर पडणेही अशक्य झाले. गंभीर आजारी रुग्णांपर्यंत ॲम्बुलन्स पोहोचू शकत नसल्याने काही सेवाभावी संस्थांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले, तर अनेक नागरिकांचे रेस्क्यू करण्यात आले. वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने राजावली, भोयदापाडा, कामण, चिंचोटी, वाघराळपाडा, मधुबन, विरार आदी भागांत बचावकार्य राबवत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. (Vasai Virar Rain News)

राज्यातील पावसाच्या महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *