कोट्यवधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 15 जुलैपर्यंत मिळणार PF चं व्याज  | बिझनेस


Last Updated:

EPFO ने कोट्यवधी PF अकाउंटधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता कर्मचाऱ्यांना पीएफवर मिळणाऱ्या व्याजासाठी अनेक महिने वाट पाहायची गरज नाही. लवकरच तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये व्याज जमा होणार आहे.

ईपीएफओ अकाउंट
ईपीएफओ अकाउंट

मुंबई : EPFO ने पीएफ अकाउंटधारकांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे. सर्वांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती. तो क्षण लवकरच जवळ येणार आहे. ईपीएफओने 15 जुलैपर्यंत 34 कोटी अकाउंटमध्ये 8.25% व्याज आणि जवळपास 1.44 कोटींचं व्याज नवीन सिस्टमच्या माध्यमातून क्रेडिट होणार असल्याची माहिती दिली आहे. यासह विशेष म्हणजे, पीएफशी संबंधित सर्व्हिसेस सहज आणि वेगाने तयार करण्यासाठी नवीन सेंट्रलाइज्ड आयटी सिस्टम लागू केली आहे. यानंतर देशभरातील PF अकाउंटचा डेटा एकाच सेंट्रलाइज डेटाबेसमध्ये राहील. यामुले सदस्य कोणत्याही EPFO ऑफिसमधून आपल्या सर्व्हिसेस घेऊ शकतील.

EPFO CITES मधून कोणकोणती काम होतील?

आता पीएफ बॅलेन्स, क्लेम स्टेटस, सर्व्हिस रेकॉर्ड आणि पेन्शनसारखी सर्व माहिती एकाच पोर्टलवर सहज उपलब्ध होईल. क्लेम केल्याने सिस्टम आधीच चुकांची माहिती देईल. ज्यामुळे रिजेक्शन कमी होईल. नवीन सिस्टम अंतर्गत पीएफ काढणंही पहिल्यापेक्षा सोपं होईल. नवीन व्यवस्थेत क्लेम दाखल केल्याने आधीच सिस्टम डॉक्यूमेंट्स किंवा माहितीत कमतरता ओळखेल. याव्यतिरिक्त, सदस्यांना प्रत्येक श्रेणीसाठी पैसे काढण्याच्या पात्र रकमेची माहिती पाहता येईल. यामुळे चुकीची रक्कम मागितली जाण्याची आणि ती नाकारली जाण्याची शक्यता ही कमी होईल.

पीएफ क्लेमशी सबंधित नियम 

EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा वाढवली आहे. आता पूर्णपणे KYC व्हेरिफाइड अकाउंटमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत अडव्हान्स क्लेम ऑटो अप्रूव्ड केले जाऊ शकतील. पहिले ही लिमिट फक्त 1 लाख रुपये होती. तुम्ही क्लेम दरम्यान एखाद्या अतिरिक्त माहितीची गरज असेल तर EPFO ऑनलाइन स्पष्टीकरण मागेल आणि सदस्यही ऑनलाइन उत्तर देऊ शकतील. यामुळे ऑफिसच्या चकरा मारण्याची गरज कमी होईल.

पीएफ विड्रॉलचे नियम 

PF विड्रॉलचे 13 मोठे नियम कमी करुन फक्त 3 सोप्या कॅटेगिरीमध्ये केले आहेत. सदस्य आता आपल्या एकूण PF बॅलेन्सचा 75% पर्यंत पैसे काढू शकतील. यासह क्लेममध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता असल्या याच ऑनलाइन उत्तर दिलं जाऊ शकेल आणि पैसा सेटलमेटच्या दिवशी थेट बँक अकाउंटमध्ये पाठवला जाईल.

कोट्यवधी पीएफ अकाउंटहोल्डर्सला दिलासा 

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपली सर्व्हिस पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान बनवण्यासाठी CITES 2.01 (सेंट्रलाइज्ड आयटी इनेबल्ड सर्व्हिसेज) प्रोसेस लागू केली आहे. केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, ही नवी व्यवस्था लागू झाल्याने पीएफ अकाउंटधारकांना नवीन सर्व्हिसेस मिळतील.

कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलंय की, नवीन सिस्टमनुसार क्लेम मंजूर झाल्याच्या दिवशीच संबंधित रक्कम थेट बँक अकाउंटमध्ये जमा केली जाईल. यासह, पीएफ (PF) बॅलेन्स रकमेवरील व्याज अंतिम पेमेंटला मंजुरी मिळेपर्यंतच्या तारखेपर्यंत जमा केलं जाईल. यापूर्वी, व्याज केवळ मागील महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतच मोजले जात होते.

EPFO ने देशभरात सर्व PF रेकॉर्ड एका केंद्रीय डेटाबेसमध्ये ट्रान्सफर केले आहेत. आधी प्रत्येक ऑफिसचा वेगळा डेटाबेस होता आणि सदस्यांना त्याच कार्यालयावर अवलंबून राहावं लागत होतं. आता कोणत्याही अधिकृत EPFO ऑफिसमधून सेवा घेतल्या जाऊ शकतील.

EPFO ने सांगितलंय की, 15 जुलैपर्यंत जवळपास 34 कोटी अकाउंटमध्ये 8.25% व्या जमा केलं जाईल. या अंतर्गत जवळपास 1.44 लाख कोटी रुपयांचं व्याज नवीन सिस्टमच्या माध्यमातून अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. आता व्याज जमा होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. या व्यतिरिक्त नोकरी बदलल्यावर पीएफ आपोआप नवीन नियोक्ताच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल आणि पेन्शनधारक देशाच्या कोणत्याही EPFO ऑफिस किंवा बँकेच्या माध्यमातून आपल्या सर्व्हिसेसचा फायदा घेऊ शकतील.

नोकरी बदलणाऱ्यांसाठीही गुड न्यूज 

नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मोठा दिलासा दिला आहे. आता आधारशी संबंधीत UAN च्या पीएफ अकाउंटचं ट्रान्सफर आपोआप होईल. यासाठी वेगळा अर्ज करणे किंवा जुन्या आणि नवीन नियोक्ताची मंजूरी घेण्याची गरज नसेल. सेवा कालावधीही ऑटो ट्रान्सफर होईल. नवीन व्यवस्थेचा फायदा EPS पेन्शनधारकांनाही मिळेल. ते आता देशाच्या कोणत्याही EPFO ऑफिसमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतील आणि इतर सर्व्हिसेस घेऊ शकतील. या व्यतिरिक्त ‘सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम’ (CPPS) च्या अंमलबजावणीमुळे, पेन्शनचे प्रकरण कोणत्या प्रादेशिक कार्यालयाशी संबंधित आहे याचा विचार न करता, आता भारतातील कोणत्याही बँक अकाउंटमध्ये पेन्शन प्राप्त करता येऊ शकेल.

मराठी बातम्या/मनी/

कोट्यवधी EPFO कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 15 जुलैपर्यंत मिळणार PF चं व्याज 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *