Hardik Pandya Trade IPL 2027 : आयपीएलमध्ये सध्या हार्दिक पांड्याच्या ट्रेडच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आगामी हंगामापूर्वी दुसऱ्या संघात जाणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांची नावे आघाडीवर होती, पण आता या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे नाव देखील समोर येत आहे.
RCB मध्ये जाणार हार्दिक पांड्या?
सुरुवातीला सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबीने हार्दिकमध्ये रस दाखवला नव्हता. मात्र, ताज्या रिपोर्ट्सनुसार, आता आरसीबी हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक आहे. आरसीबीने सलग दोन वेळा (2025 आणि 2026) आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी ते हार्दिकला ट्रेड करू शकतात.
🚨 TRADE RUMOURS: RCB get Hardik Pandya, MI get Josh Hazlewood and Romario Shepherd! Fair deal or absolute madness? 👀🔥 #IPL2027 #RCB #MumbaiIndians #HardikPandya #IPL pic.twitter.com/zCUdQzi77j
— Seedhe Sport (@Seedhe_Sport) July 7, 2026
बदल्यात मुंबई इंडियन्स (MI) कोणत्या 2 खेळाडूंना घेणार?
जर हार्दिक पांड्या आरसीबीमध्ये गेला, तर मुंबई इंडियन्स आरसीबीकडून दोन चॅम्पियन खेळाडूंची मागणी करू शकते. हे दोन खेळाडू खालीलप्रमाणे असू शकतात. जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि घातक वेगवान गोलंदाज, जो मुंबईच्या गोलंदाजीला अधिक बळकटी देऊ शकतो. रोमारिओ शेफर्ड वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू, जो हार्दिक पांड्याची जागा भरून काढू शकतो. हार्दिक पांड्याच्या आरसीबीमधील ट्रेडबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही, या केवळ चर्चा आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्स मध्ये जाण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. केकेआर हार्दिकच्या बदल्यात रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना मुंबईला देऊ शकते, अशाही चर्चा आहेत. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी हार्दिकला संघात घेण्याच्या चर्चा आधीच फेटाळून लावल्या आहेत. हार्दिक पांड्या नक्की कोणत्या संघात जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो आरसीबीमध्ये जाऊन इतिहास रचणार की केकेआर किंवा राजस्थान रॉयल्ससारख्या संघाची कमान सांभाळणार, हे येणाऱ्या काळातच समजेल.
Hardik Pandya wearing the RCB jersey would be a sight nobody expected! 👀❤️
Could this mega trade actually happen? #HardikPandya #RCB #IPL2027 #MumbaiIndians #Cricket pic.twitter.com/jKd2wtYjEe
— Mumbai Insight (@Mumbai_Insight) July 7, 2026
हार्दिक पांड्याची आयपीएल कारकीर्द
हार्दिक पांड्याने 162 आयपीएल सामने खेळून 10 अर्धशतकांसह 2955 धावा केल्या आहेत. त्याने या सामन्यांमध्ये 82 बळीही घेतले आहेत. कर्णधार म्हणून त्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आणि त्यानंतर 2023 मध्ये संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.
हे ही वाचा –