Last Updated:
दीर्घकाळ एका जागी बसून राहणं शरीरासाठी धूम्रपान किंवा लठ्ठपणा इतकंच हानिकारक असतं. म्हणूनच, डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञ आता ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना ठराविक अंतरानं उठून हालचाल करण्याचा सल्ला देतात.
मुंबई : कामामुळे बहुतांश जणांना सलग काही तास एका जागी बसावं लागतं. पण यातूनही मार्ग काढून छोटे सोपे व्यायाम करणं सहज शक्य आहे.
नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांना भेडसावणारी ही समस्या आणि त्यावरचा उपाय पाहूया. सकाळी ऑफिसमधे आल्यापासून ते संध्याकाळी घरी जाईपर्यंत, सलग आठ ते नऊ तास बसून काम असतं. मात्र, इतका वेळ बसून राहिल्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दीर्घकाळ एका जागी बसून राहणं शरीरासाठी धूम्रपान किंवा लठ्ठपणा इतकंच हानिकारक असतं. म्हणूनच, डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञ आता ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना ठराविक अंतरानं उठून हालचाल करण्याचा सल्ला देतात.
दीर्घकाळ बसून राहिल्यानं आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. सतत बसून राहण्यामुळे विविध शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, यामुळे अनेकदा कंबर आणि मानेच्या भागात सतत वेदना होतात, कारण पाठीच्या कण्यावर सतत ताण पडत असतो. तसंच, खांदे झुकल्यासारखे होतात आणि पाठीची ठेवण बिघडू शकते.
दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो. तसंच यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात; कारण दीर्घकाळ बसून राहिल्यानं शरीराची कॅलरीज खर्च करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते, असंही संशोधनात आढळून आलं आहे.
दीर्घकाळ एकाच जागी बसून राहण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘डेस्क वर्कआउट्स’चा म्हणजेच कामाच्या ठिकाणी कोणते व्यायाम करता येतील पाहूया.
आपल्या डेस्कवरच काही सोपे व्यायाम करून या दुष्परिणामांची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करता येते. उदाहरणार्थ, दर अर्ध्या किंवा एका तासानं उठून काही मिनिटं चालावं. तसंच, बसल्या जागी मान हलकेच डावीकडे-उजवीकडे आणि वर-खाली फिरवल्यानं मानेचा ताठरपणा कमी होण्यास मदत होते.
Mumbai,Maharashtra
Jul 07, 2026 10:33 PM IST
