Mumbai News : दादर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर रेल्वे स्थानकावर महिलेला रेल्वे रुळावरच मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भरदिवसा व्यक्तीकडून महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. परिसरातील अनेकजण फक्त पाहत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमकी मारहाण का केली जात आहे, याच कारण अद्याप अस्पष्ट
दादर रेल्वे स्टेशनवर भरदिवसा एका व्यक्तीकडून महिलेला मारहाण केली जात आहे. नेमकी मारहाण का केली जात आहे, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट नाही. रेल्वे पोलिसांकडून घटनेची पडताळणी आणि तपास अपेक्षित आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ चांगलचा व्हायरल होत आहे.
डोंबिवलीतही धक्कादायक घटना, शिवसेना नगरसेवकाने सहकाऱ्यांसह डॉक्टरांना केली मारहाण
‘माझा फोन का उचलला नाही?’ या क्षुल्लक कारणावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आपल्या प्रभागातील गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्याने रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली. तर एका महिला डॉक्टरला देखील धक्काबुक्की करत अरेरावी आणि दमदाटी केली. रुग्णालयातील हा सर्व थरार तेथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टर आणि महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. माझा फोन का उचलला नाही? या शुल्लक कारनावरुन नगरसेवकाने मारहाण केली आहे. रमेश म्हात्रे असं या नगरसेवकाचं नाव आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.