Tharala Tar Mag 23 May 2026 : ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सचिन सुभेदारांनाच सुनावतो आणि सुनावणीसाठी अस्मिताला ओपन चॅलेंज देतो.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘ ठरलं तर मग ‘ मालिकेच्या २३ मेच्या एपिसोडमध्ये पूर्णा आजी सायलीला तिचेच बालपणीचे फोटो दाखवते. पूर्णा आजी सायलीला बालपणीच्या आठवणी सांगते. सायली तिला भास होत असलेला लपाछपी खेळतानाचा फोटो बघते. पूर्णा आजी सायलीला म्हणते, ‘तुला लवकरात दिवस जावेत आणि तुला मुलगी व्हावी. म्हणजे मला तुझं बालपण अगदी मनभरून पाहता येईल.’ सायली, सर्व फोटो स्वतःकडे ठेवते.
सायलीनं सचिनला सुनावले खडे बोल
दुसरीकडे, सचिनला घटस्फोटाच्या पहिल्या सुनावणीची नोटीस येते. सचिन सुभेदारांकडे जाऊन राडा घालण्याचं प्लॅनिंग करतो. सुभेदारांच्या घरात सुखाचं वातावरण असताना सचिन सुभेदारांकडे जातो. सचिन त्याच्यासोबत एक पेन घेऊन जातो. त्यामध्ये कॅमेरा असतो. ‘पुरावे कसे गोळा करायचे, हे मी दाखवतो आणि सर्वांनाच ते महागात पडणार आहे’ असं सचिन स्वतःशीच म्हणतो. सेलिब्रेशनचा विषय चालू असताना सचिन टाळ्या वाजवत सुभेदारांकडे येतो. अस्मिता सचिनला खडे बोल सुनावते. सचिन उर्मटासारखा सर्वांसोबत बोलतो. Arya Babbar : ‘सुंदर स्त्रीकडे कोण आकर्षित होत असेल तर चुकीचं काय?’ राज बब्बर आणि रेखा यांच्या नात्यावर मुलगा आर्यची प्रतिक्रिया सायलीसुद्धा सचिनला चांगलं सुनावते आणि निघायला सांगते. सचिन सगळं पेनमध्ये असलेल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असतो. सचिन सुभेदारंना म्हणतो, ‘तुम्ही सगळ्यांनी माझ्याविरोधात अस्मिताचे कान भरवलेत आणि आता तिलासुद्धा घटस्फोट हवाय.’ त्यावर अस्मिता म्हणते, ‘मीच ठरवलंय. पण, कोणीही माझे कान भरलेले नाहीत. कारण, मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचंच नाहीये’ यावर सचिन म्हणतो, ‘बरोबर आहे, कारण तुला दुसऱ्याच माणसासोबत आयुष्य काढायचंय.’ हे ऐकून सर्वांना धक्का बसतो.
सचिनचा रोख चैतन्यकडे असतो. सचिन म्हणतो, ‘जिथे अस्मिता तिथे चैतन्य’ सचिन चैतन्य आणि अस्मितावर संशय घेतो. सचिनच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू होतात. सचिन म्हणतो, ‘तुम्ही सगळे माझ्याविरुद्ध पाहिजे तो जोर लावा, मी कशालाच घाबरणार नाही. कारण, माझी बाजू सत्याची आहे.’ असं म्हणून सचिन निघून जातो. सायलीला सगळ्याचा खूप त्रास होतो. अस्मिताला खूप वाईट वाटतं. अर्जुन सुनावणीसाठी अस्मिताला पाठबळ देतो. Zee Marathi Serial : ‘कृष्णाईच्या लेकी’ मध्ये स्टार प्रवाहच्या अभिनेत्रीची वर्णी, ‘झी मराठी’ च्या नव्या मालिकेची तारीख आणि वेळही जाहीर पुढे, सायलीला स्वप्नात ती लहान मुलगी दिसते. सायली पुन्हा पूर्णा आजीने दिलेले फोटो बघते. दुसरीकडे, अस्मिताला पोटगी हवी असते म्हणून सचिन चिडचिड करतो. साक्षी सचिनला नवीन प्लॅन सांगते. त्यामुळे आता सुभेदारांच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा