SRH vs RCB News : आरसीबी आणि एसएआरएच यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे. ५५ धावांनी घरच्या मैदानावर विजय मिळवला. आता पॉइंट टेबलमध्ये तीन संघांचे गुण १८ झाले असल्याने नेमकं कोण प्ले ऑफमध्ये टॉप २ असणार? सविस्तर जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलमधील ६७ वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये पार पडला. या सामन्यामध्ये हैदराबाद संघाने २० ओव्हरमध्ये २५५-४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ ५५ धावा करू शकला.रजत पाटीदार ५६ धावा, वेंकटेश अय्यर ४४ धावा आणि कृणाल पंड्याच्या नाबाद ४१ धावा सोडल्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पण हा सामना हरल्यावरही आरसीबी संघाने पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर राहिली आहे. नेमकी कशी काय जाणून घ्या.
आरसीबी संघाचे १८ आणि आणि सनरायजर्स हैदराबादचे १६ गुण होते पण नेट रन रेट आरसीबीचा चांगला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादला पहिल्या स्थानावर जाण्याची संधी होती मात्र तसे झाले नाही. सनरायजर्स हैदराबाद संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २५५ धावा ठोकल्या होत्या, त्यामुळे आरसीबीला पहिल्या स्थानावर कायम राहण्यासाठी १७८ धावा करायच्या होत्या. तर हैदराबादने सामना ८० धावांनी जिंकला असता तर आरसीबीचा संघ पहिल्या स्थानावर जाणार होता. मात्र तसे काही झाले नाही. Hardik Pandya : मुंबई इंडियन्स हरल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्यावर बीसीसीआयकडून कारवाई, नेमकं काय कारण? या सामन्यामध्ये ट्रॅव्हिस हेड २६ धावा करून आऊट झाला. इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी २६ चेंडूत ५२ धावांची भागीदारी करत पाया रचला होता. मात्र अभिषेक २२ चेंडूत ५६ धावा करत आऊट झाला. त्यानंतर आलेल्या क्लासेन याने इशानच्या साथीने ४८ चेंडूत ११३ धावांची मोठी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. क्लासेन २४ चेंडूत ५१ धावा करून आऊट झाला. यामध्ये त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले. मात्र इशान किशन हटला नाही त्याने ४६ चेंडूत ७९ धावांची दमदार खेळी केली. Yuzi Chahal: ‘तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकल्यानंतर, माझं आयुष्य पूर्णपणे बदललं’; युझीने हरलीनला मनातलं सगळं सांगून टाकलं आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यावर विराट आणि वेंकटेश अय्यरने ६० धावांची सलामी दिली. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात ४४ धावांवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहलीसुद्धा १५ धावांवर आऊट झाला. देवदत्त पड्डिकल २१ धावा, रजत पाटीदारने ५६ धावांची खेळी करत लढाई सुरू ठेवली होती. त्यासोबतच कृणाल पंड्याने ४१ धावा केल्या पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.
पॉइंट टेबलमध्ये आरसीबी १८, गुजरात १८ आणि हैदराबाद १८ गुण आहेत. त्यामुळे टॉप २ आरसीबी आणि गुजरात फिक्स आणि तिसऱ्या स्थानी हैदराबाद असणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा