Ahilyanagar Rain: भंडारदऱ्यात निसर्गाचं तांडव! 24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थिती, कळसूबाई, सांदन व्हॅलीसह ‘ही’ प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद


Ahilyanagar Rain: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात गेल्या 24 तासांत पावसाने अक्षरशः तांडव घातले असून, येथे तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील घाटघर (Ghatghar) आणि रतनवाडी (Ratanwadi) परिसरात ढगफुटीसदृश (Cloudburst) पाऊस झाल्याने स्थानिक नदी-नाल्यांना पूर आला आहे.

Ahilyanagar Rain:  आदिवासी दुर्गम भागात जनजीवन विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर

घाटघर आणि रतनवाडी परिसरातील अतिवृष्टीमुळे या दुर्गम आदिवासी भागातील (Tribal Area) जनजीवन पूर्णपणे प्रभावित (Disrupted) झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून (Administration) चोख खबरदारी घेतली जात आहे.

Ahilyanagar Rain:  धोकादायक पर्यटनस्थळे बंद; धबधब्यांवर जाण्यास मनाई

पावसाचा वाढता जोर पाहता भंडारदरा धरण परिसरातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे (Tourist Spots) तात्काळ बंद करण्यात आली आहेत. कळसूबाई शिखर, ट्रेकर्सचे नंदनवन मानली जाणारी सांदन व्हॅली, रतनवाडी आणि परिसरातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांच्या खाली जाण्यास प्रशासनाने पर्यटकांना सक्त मनाई केली आहे.

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम; इगतपुरीत 200 मिमी

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातही मान्सूनचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात सर्वाधिक 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.

सुरगाणा: 149 मिमी

त्र्यंबकेश्वर: 125 मिमी

सिन्नर: 74 मिमी

पेठ: 61 मिमी

दिंडोरी: 58 मिमी

पिंपळगाव: 51 मिमी

देवळा: 40 मिमी

सतत होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष असून, नागरिकांना आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Dam: नाशिकमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

– काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस; धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

– नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरले

– दारणा धरणातील पाणीसाठा 21% वर

– भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरले

– जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 28% वर पोहोचला

– सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष. 

आणखी वाचा 

Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा ‘तो’ भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील ‘या’ भागावर अतिवृष्टीचं संकट?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *