Missing Link Mumbai Pune: मिसिंग लिंक 18 तासांनी सुरु झाला पण बोगद्याच्या तोंडावर ‘धबधबा’, लहान दगड धडाधड खाली, अजूनही वाहनांसाठी धोका?


Missing Link Mumbai Pune: लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दिवसभर दरड कोसळून ठप्प झालेली पुणे-मुंबई मिसिंग लिंक (Missing Link) मार्गिका तब्बल अठरा तासांनी खुली करण्यात आली होती. मात्र, सध्या दोनचं लेनवरून वाहतूक सुरु आहे. कारण बोगद्याच्या वरुन अद्यापही धबधब्यासारखं पाणी वाहतंय, त्यातून छोटी-छोटी दगडं ही खाली येतायेत. त्यामुळं इथला धोका खरंच टळलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. (Maharashtra Rain news)

काल दरड कोसळल्यानंतर मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा खाली आला होता. साडेअठरा तासांनी पुणे-मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली करण्यात आली आहे.  पहाटे चार वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली, धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं, बांधकाम कोसळलं. त्यामुळे हा सगळा राडारोडा हटवायला 18.30 तास लागले. दरम्यान, आता  पुण्याहून मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका खुली करण्यात आली. मात्र, या निमित्ताने मोठ्या थाटामाटात उद्घाटनं आणि हजारो कोटींचा खर्च सगळंच पावसाच्या पाण्यात वाहून गेलं म्हणण्याची वेळ आली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचा पहिल्याच पावसात फज्जा उडाल्याचं पाहायला मिळाले. तसंच सात हजार कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकबाबत अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. (Mumbai Pune Missing Link start or not)

Rain Updates: महाराष्ट्रात मागील 24 तासात (सकाळी 8.30 पर्यंत)
 

कोल्हापूर – ४३ मिमी 
पुणे – ९७.५ मिमी 
नाशिक – ८३.६ मिमी 
सातारा – ७०.३ मिमी 
सांताक्रुज – ९०.४ मिमी 
कुलाबा – ५७.२ मिमी 
महाबळेश्वर- ४०३ मिमी
डहाणू – ३९९ मिमी

Lonavala Rain: लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 490 मिमी पाऊस

लोणावळ्याला कालच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय. गेल्या चोवीस तासांत तब्बल 490 मिलिमीटर पाऊस बरसला. आजवरचा हा विक्रमी पाऊस असल्याचं बोललं जातंय. पावसाचा हा जोर पाहून लोणावळा आणि परिसरातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्यात. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांवर निर्बंध लावण्यात आलेत.

Devendra Fadnavis on Rain: अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळली. या सगळ्या घटना निसर्गाचे चक्रं बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाने सगळी तयारी केली होती, पण त्याच्या विपरीत घटना घडत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. जशी कनेक्टिंक लिंकला दरड कोसळल्यानंतर लगेच वाहतूक बंद करण्यात आली.  मुंबई आणि पुणे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली किंवा वळवण्यात आली. राज्य सरकार आणि यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. मुंबईपुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर  100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली की, जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. 

आणखी वाचा

Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला

Devendra Fadnavis on Missing Link: ‘इन्फ्रामॅनचा डिझास्टर मॅन झाला’, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना घेरलं

पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा ‘तो’ भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील ‘या’ भागावर अतिवृष्टीचं संकट?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *