Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: ‘खाशाबा’मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?


Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) संपूर्ण जगभरात ख्याती मिळालेला 100 कोटींचा सिनेमा मिळवून देणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Director Nagraj Manjule) यांचा आगामी सिनेमा ‘खाशाबा’चा दमदार टीझर (Khashaba Teaser) नुकताच प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित सिनेमा म्हणजे, काहीतरी अफलातून पाहायला मिळणार, यात काही शंकाच नाही. तसंच काहीसं झालंय ‘खाशाबा’ सिनेमाचा टीझर (Khashaba Marathi Movie Teaser) पाहिल्यानंतर वाटतंय. सिनेमाचा दमदार टीझर पाहून आतापासूनच सिनेमाची उत्सुकता ताणली गेलीय. सिनेमात दिग्गजांची मांदियाळी झळकलीय, अगदी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यांच्यासोबतच स्वतः नागराज मंजुळेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण सिनेमातल्या टीझरमधल्या एका चेहऱ्याची जोरदार चर्चा रंगलीय. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ सिनेमात त्यांची पत्नी आणि निर्माती गार्गी कुलकर्णी (Gargi Kulkarni) देखील झळकणार आहे. यातली महत्त्वाची बाब म्हणजे, नागराज आणि गार्गी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं आपण म्हणतो. नागराज मंजुळेंच्या मागे असलेली ही, स्त्री म्हणजे, त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णी.

Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: 'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?

गार्गी कुलकर्णी नेमक्या आहेत तरी कोण? (Who Is Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni?)

गार्गी कुलकर्णी या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पत्नी असून त्या सिनेमा निर्मिती, वेशभूषा आणि क्रिएटिव्ह रायटिंगची आवड आहे. 2017 मध्ये नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांनी लग्न केलेलं. गार्गी कुलकर्णी या मूळच्या अहमदनगरच्या. गार्गी यांनी आजवर सिनेसृष्टीत पडद्यामागे अनेक प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: 'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?

तसेच, नागराज मंजुळे यांच्या निर्मिती संस्थेच्या कामकाजातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘घर बंदूक बिर्याणी’ आणि ‘नाळ 2’ यांसारख्या सिनेमांमध्ये कार्यकारी निर्मिती आणि वेशभूषा विभागात काम केलंय. 

Nagraj Manjule Wife Gargi Kulkarni: 'खाशाबा'मध्ये झळकणार नागराज मंजुळेंची पत्नी; 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावणारी गार्गी कुलकर्णी कोण?

नागराज यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं की, गार्गी यांना वाचन आणि कवितेची विशेष आवड आहे. त्या स्वतः कविता लिहितात आणि त्यांना साहित्याची उत्तम जाण असल्यामुळे नागराज यांच्या प्रत्येक नव्या सिनेमाची पटकथा सर्वात आधी गार्गी यांनाच वाचायला देतात, असंही सांगितलेलं. 

दरम्यान, गार्गी कुलकर्णी या प्रसिद्धीपासून दूरच असतात, त्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसतात. पण, आता पहिल्यांदाच त्या रुपेरी पडद्यावर जळकणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

‘खाशाबा’ सिनेमाचा टीझर पाहिलात?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ ‘खाशाबा’वर, अभिनेता आहे तरी कोण?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *