Numerology 23 May 2026: मूलांक 4 विचारांचा अतिरेक टाळा! जाणून घ्या, मूलांक शास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य


Numerology Prediction, 23 May 2026: मूलांक 1, 4 सह या मूलांकासाठी विचारांचा अतिरेक टाळा, मूलांक 5 सह या मूलांकांनी रागावर नियंत्रण ठेवा, मूलांक 6, 7 सह या मूलांकांसाठी करिअरमध्ये प्रगती, आणि मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि संयमामुळे सर्व मूलांकासाठी शनिवार लाभदायक ठरेल. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09 साठी शनिवार कसा आहे?

Numerology 23 May 2026
Ank bhavishya,23 May 2026: मूलांक 1 असणाऱ्यांनी मन एकाग्र ठेवा, मूलांक 3 नातेसंबंध सुधारतील, मूलांक 6 करिअरमध्ये मेहनत जास्त तर मूलांक 9 असणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील तसेच मेहनतीचे फळ मिळेल. चला तर पाहूया मूलांक 01 ते 09 या मूलांकांसाठी शनिवार कसा असेल?

मूलांक 1 – मन एकाग्र करा, अती विचार घातक

मूलांक 1 - मन एकाग्र करा, अती विचार घातक

मूलांक 1 असणाऱ्यांनी मनावर कंट्रोल ठेवावा. विचारांची गर्दी मन भरून टाकेल पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. विचारांची अतिरेक तुम्हाला कामापासून, कर्तव्यापासून दूर घेवून जाईल तेव्हा वेळेवर सावध व्हा. मन एकाग्र करून तुमचे काम किंवा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. योग किंवा ध्यानधारणा महत्त्वाची आहे.

मूलांक 2 – फसवणुकिची भीती, सावध राहा

मूलांक 2 - फसवणुकिची भीती, सावध राहा

मूलांक 2 असणारे जर कला आणि संगीत क्षेत्रात काम करत असतील तर नवीन संधी मिळू शकते. तुम्ही दुखावले गेला आहात किंवा मानसिक त्रास होतो आहे तर फक्त तज्ज्ञांकडे ते शेअर करा. नातेवाईक किंवा मित्र त्याचा गैरफायदा घेवू शकतात. तुम्ही सावध राहा कारण फसवणुकिची भीती आहे.

मूलांक 3 – नातेसंबंध सुधारतील

मूलांक 3 - नातेसंबंध सुधारतील

मूलांक 3 साठी नातेसंबंधात सुधारणा दिसून येईल. कोणासोबत कटूपणा असेल तर कमी होईल नवीन लोकांशी भेटी होतील त्यामुळे भविष्यात नवीन संधींचे द्वार खुले होणार आहे. जे काम हाती घेणार त्यात फोकस महत्त्वाचा आहे.

मूलांक 4 – विचारांचा अतिरेक टाळा

मूलांक 4 - विचारांचा अतिरेक टाळा

मूलांक 4 असणारे खूप विचार करतात. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात. तुम्ही विचारांचा अतिरेक टाळा. विचारांचा हा अतिरेक, तो वेग तुम्हाला सध्याच्या कामांपासून दूर करू शकतो. मन एकाग्र ठेवून थांबलेले काम पूर्ण करा.

मूलांक 5 – रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 5 - रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 5 असणाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वादविवाद यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तेव्हा सकारात्मक विचार करा. सगळ्यांसोबत आपुलकीने वागा. काही गैरसमजामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. कामात यश आहे फक्त मेहनत जास्त असेल.

मूलांक 6 – मेहनत, प्रामाणिकपणा, संयम यशाची सुत्रे

मूलांक 6 - मेहनत, प्रामाणिकपणा, संयम यशाची सुत्रे

मूलांक 6 असणाऱ्यांची कामे दुपारनंतर पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत फक्त मेहनत, प्रामाणिकपणा, संयम यावर फोकस करा. नोकरी असो वा व्यवसाय जुने प्रलंबित काम मार्गी लागेल, कर्जाचे काही हफ्ते फेडणार आहात. त्यामुळे थोडं रिलॅक्स फिल कराल.

मूलांक 7 – कामाचे कौतुक होणार

मूलांक 7 - कामाचे कौतुक होणार

मूलांक 7 असणारे जे जातक नोकरी करतात त्यांच्यासाठी वेळ शुभ आहे. चांगली बातमी मिळेल त्यामुळे आत्मविश्वासासह मानसिक समाधान वाढेल. कामाचे कौतुक होणार असून आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. घरात वातावरण सकारात्मक असेल.

मूलांक 8 – अचानक धनलाभाचे योग

मूलांक 8 - अचानक धनलाभाचे योग

मूलांक 8 साठी शनिवार चांगला असून मदत मिळाल्यामुळे काम पटापट पूर्ण होईल. तुमच्याकडे काम वाढत आहे ते पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे. अचानक धनलाभाचे योग असून गुंतवणुकिचा विचार करत असाल तर सल्ला घ्या. घरात वातावरण समाधानाचे असेल.

मूलांक 9 – जबाबदारी वाढणार, कामात यश

मूलांक 9 - जबाबदारी वाढणार, कामात यश

मूलांक 9 साठी शनिवारी भरपूर काम असणार आहे. घर आणि ऑफिस दोन्हीकडील जबाबदाऱ्या वाढतील. जे काम हाती घेणार त्यात फोकस महत्त्वाचा आहे. तुम्ही खूप वेळ असे समजात तुम्ही एकटे आहात पण असे नाही. तुमच्या मनाची अस्वस्थता लवकरच कमी होणार आहे. प्रोजेक्ट वाढत आहेत, मेहनत जास्त आहे पण त्याचे फळ नक्की मिळेल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा