Heavy Rain Lonavala: लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी


Heavy Rain Lonavala: पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 267 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची (Rain news) नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावला आहे. लोणावळा (Lonavala) आणि परिसरात आत्तापर्यंत 1090 मिलिमीटर पाऊस बरसलाय. या पावसाने शेतकरी वर्ग ही पेरणीच्या कामाला लागलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ही तुलना करता पावसाने आणखी कृपादृष्टी दाखवावी, अशी अपेक्षा लोणावळाकरांना आहे. (Maharashtra Rain news)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, लोणावळ्यात 24 तासांत तब्बल 670 मिमी पाऊस झाला आहे. आज सकाळी 6.30 पर्यंतच्या 24 तासांत 670 मिमी पाऊस बरसला आहे. भिरामध्ये 609 मिमी, ताम्हिणी घाटात 580 मिमी पाऊस, मावळ तालुक्यातील शिरगावला 540 मिमी पाऊस, लोणावळा-लवासा दरम्यानच्या आंबोश्यात 537 मिमी पाऊस, खोपोलीत 24 तासांत 516 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे.

मागील पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराला अक्षरशः जलमय स्वरूप आले. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. नांगरगाव, भांगरवाडी, तुंगारली, रायवूड, दामोदर कॉलनी, वर्धमान सोसायटी ईतर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही मार्गावर अडीच ते तीन फूट पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. शहरातील वाढते बांधकाम, नदी-नाल्यांवरील अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

School Rain: लोणावळ्यात अतिवृष्टीमुळं 6 जुलैला शाळांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी 5 ते 7 जुलै २०२६ दरम्यान मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अशोक साबळे यांनी लोणावळा शहरातील सर्व माध्यमांच्या अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

सतत होणारा पाऊस आणि नगरपरिषद सदस्य व शिक्षण विभागाच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Satara Rain: साताऱ्यात पावसाची तुफान बॅटिंग; महाबळेश्वरात उच्चांकी असा 473 मिमी पाऊस, कोयना धरणात 78 हजार क्युसेक पाण्याची आवक

सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून पश्चिम भाग अक्षरशः पावसाने झोडपून काढला आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 473 मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि वाई तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दुसरीकडे, कोयना पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात जवळपास 78 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. कोयना येथे 257 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा 22.54 टीएमसीवर पोहोचला आहे.हवामान विभागाने पुढील काही दिवसही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Mumbai Rain: मुंबईतील पाण्याचे तलाव भरले

मुंबई धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मागील 48 तासात  आठ टक्के पाणीसाठा मध्ये वाढ झाली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 16.92 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. ज्याप्रकारे सद्यस्थितीत पाऊस पडत असताना या पाणी साठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ही मुंबईकरांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे. 

Maharashtra Rain: गेल्या 24 तासांत किती पाऊस झाला? (सकाळी 8.30 पर्यंत)

 
सातारा – ५५ मिमी 
कोल्हापूर – ३० मिमी 
रत्नागिरी – ७४.४ मिमी 
कुलाबा – १२८ मिमी 
नाशिक – १९ मिमी 
नवी मुंबई – १५१ मिमी 
सांताक्रुज – १५९.२ मिमी 
महाबळेश्वर- ५१३ मिमी
पुणे – १०८.४ मिमी 
डहाणू – ११०.३ मिमी

आणखी वाचा

Rainfall Landslide : उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 600 मिमी पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका, झऱ्यातून गढूळ पाणी येणे ते झाडांची स्थिती, मयुरेश प्रभुणे म्हणाले…

Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *