Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला


Mumbai Pune Missing Link Land Slide: प्रचंड गाजावाजा करुन बांधण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक महामार्गाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅब कोसळल्याचा प्रकार घडला. स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर छतामधून माती आणि पाण्याचा लोंढा रस्त्यावर कोसळत होता. त्यामुळे सध्या मिसिंग लिंकवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mumbai Pune Express Way)

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नव्या आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करु नये, असे आवाहन केले आहे. सध्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. गेल्या चार तासांपासून लोणावळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  गेल्या काही तासांमध्ये लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीच्या कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे. 

Maharashtra Rain: कोणकोणते रस्ते बंद आहेत?

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे बंद

मुंबई – पुणे जुना हायवे बंद

मुंबई  – गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद

रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद

रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद

रायगड – माणगाव-पाली मार्ग बंद

रायगड – माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद

रायगड वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली, वरंध घाटातील वाहतूक बंद, पुणे आणि रायगड जिल्ह्याचा संपर्क तुटला

Pune News: प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, ‘पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते’

Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *