भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध मालिकेतही सुरुवात वाईटच झाली, भारतीय संघाने दुसरा सामना गमावला. इंग्लंडने दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. इंग्लंडने तर हा सामना 19 व्या षटकांतच जिंकला. या सामन्यात एका गोष्टीची जास्त चर्चा झाली ती म्हणजे बहुप्रतिक्षित डेब्यू. अखेर कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पण मिळाले आणि सर्व क्रिकेटप्रेमींना आनंद झाला. पण वैभवला संघात घेऊनही भारतीय संघाला काही विशेष निकाल मिळालेला नाही. वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूनंतरही भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरने संघाची धुरा हाती घेतल्यापासून त्याला काही विशेष यश मिळत नाही. यातच आता काल सामना दरम्यान एक चित्र पाहायला मिळाले.
भारत आणि इंग्लंड दुसऱ्या सामन्यात गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी मैदानात आला. यावेळी गंभीरने श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष केलं. तर इशान किशनला सल्ले देताना दिसला. गंभीरचे ऐकण्यासाठी अय्यर जेव्हा जवळ गेला, त्यावेळी देखील गंभीरने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि तो इशानशी बोलत राहिला, त्यामुळे गंभीर आणि श्रेयस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. त्याचा परिणाम भारतीय संघाच्या खेळावर होत आहे. भारतीय संघाच्या पराभवामागे संघातील वातावरण कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
I think it’s unfair of us to blame poor Shreyas Iyer for whatever happened in Ireland and today. It’s clear that Gambhir has appointed the perfect puppet captain for himself for T20Is. Blame Gambhir.pic.twitter.com/Q7fV50qykM
— Conqueror (@ConquerorDGAF) July 4, 2026
खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवला कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आले नाही तर त्याला संघातून पण वगळण्यात आले. सूर्याचा फॉर्म जरी खराब असला तरीही त्यांच्या कर्णधारपदात भारतीय संघाला विशेष यश मिळाले आहे. टी- 20 मालिका भारतीय संघ जिंकायची. याउलट श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून आयर्लंडविरुद्धची मालिकाही जिंकू शकला नाही. संघात इतके तगडे खेळाडू असूनही असे का होत आहे आता यावर विचार करण्याची गरज आहे. जेव्हा सूर्या कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळायचा तेव्हा सूर्या आणि गंभीरमध्ये समन्वय चांगले होते त्याचा परिणाम भारतीय ड्रेसिंग रुममध्ये होत होता. कोच आणि कर्णधारामध्ये वाद नसला की खेळाडूंमध्येही आनंदाचे वातावरण असते.