Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


Folk Artist Dr. Teejan Bai Dies: पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या आणि छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला ‘पंडवानी’ (Pandavani Singer) जागतिक स्तरावर पोहचवणाऱ्या ज्येष्ठ  लोकगायिका डॉ. तीजन बाई (Teejan Bai) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  माहितीनुसार, तीजन बाई यांनी रायपूर येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार  तीजन बाई या गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनामुळे भारतीय लोककला जगतावर शोककळा पसरली आहे.  तीजनबाई यांनी लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली होती.  त्यांना आपल्या कारकि‍र्दीसाठी  पद्मविभूषण पुरस्कारानेही  सन्मानित करण्यात आले.  तीजन बाईंनी महाभारतातील कथा रंगमंचावर सादर करुन  भारतीय लोककला विश्वात ओळख निर्माण केली होती. 

डॉ. तीजन बाई यांचे निधन (Folk Artist Dr. Teejan Bai Dies)

तीजन  बाई यांचे लोककला विश्वात मोठे कार्य होते.   आपल्या कार्यासाठी त्यांचे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1988 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1995 त्यांना संगीत नाटक  अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  तर, 2003 साली त्यांचे पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर,  2003 साली, त्यांचा Hon. D.Litt., Bilaspur University  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

तर, 2016 मध्ये त्यांना एम एस सुब्बालक्ष्मी शताब्दी अवॉर्ड  मिळाला.   तर, 2019 साली त्यांचा पद्म विभूषणने सन्मान करण्यात आला.  तीजन बाईंचा जन्म भिलाई गावातील गनियारी येथे झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव  हुनुकलाल परधा आणि आईचे नाव सुखवती आहे. तीजन बाई यांच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचं झाल्यास, वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते.  त्यांना आपल्या आयुष्यात मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. 

पण तीजन बाई यांनी कधीही हार मानली नाही. तीजन बाई यांनी केवळ देशातच नाही तर, परदेशातही लोककलेला ओळख मिळवून दिली होती.  12व्या वर्षी लग्न झाल्यानंतर  13 व्या वर्षी त्यांनी शेजारच्या गावात पब्लिक परफॉर्मेंस सादर केलं होतं. त्या सादरीकरणासाठी त्यांना 10 रुपये मिळाले होते.   तीजन बाई यांनी  ‘पांडवानी’ हे ‘कापालिक’ स्टाइलमध्ये गेले होते. अशा शैलीत कला सादर करणारे तीजन बाई पहिली महिला ठरली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘वेलकम टू द जंगल’ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, ‘अल्फा’लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?

‘ईठा’ सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *