Vaibhav Sooryavanshi: काय करु अरे? अभिषेक शर्माला 15 वर्षीय वैभवकडून घ्यावा लागला सल्ला; मॅचमधील Video Viral – Marathi News | Abhishek sharma spotted seeking advice from vaibhav sooryavanshi during india vs england 2nd t20 match


भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अर्निणित राहिला. आता दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकली आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या पण भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही. इंग्लंडच्या संघाने एक षटक शिल्लक असताना 4 विकेटने सामना जिंकला. कालच्या सामन्यात क्रिकेटच्या चाहत्यांना आनंद झाला असेल. इतके दिवस ज्याची वाट पाहत होते अखेर तो क्षण आला आणि सर्व क्रिकेटप्रेमीच्या चेहऱ्यावर एकच आनंद पसरला. जेव्हा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितले की वैभव सूर्यवंशी आज डेब्टू करतोय तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद हसू पसरले. वैभवकडे किती प्रतिभा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पदार्पााच्या सामन्यात वैभवकडून अभिषेक शर्माने सल्ला घेतला.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभवला पदार्पणाची संधी मिळाली. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वैभवने अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 50 धावा जोडल्या. दोघांनी मिळून या सामन्यात टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली. या सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक वैभवकडे सल्ला विचारताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैभव आणि अभिषेक फलंदाजी करत असताना, एका षटकाच्या मध्यात अभिषेकने पदार्पण करणाऱ्या वैभवला विचारले की, पुढचा चेंडू पुढे मारावा की मागे. त्यावर वैभवने उत्तर दिले, “तुम्ही स्वतःच बघा, या खेळपट्टीवर डबल बाऊन्स आहे.” वैभवने हेही स्पष्ट केले की, त्याने खेळलेला चेंडू फार वेगवानही नव्हता आणि त्याला कमी बाऊन्सही नव्हता. वैभवचा हा पहिलाच सामना असूनही, अभिषेकने ज्या प्रकारे त्याचा सल्ला मागितला, त्यातून संपूर्ण संघाचा त्याच्यावरील विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.

या सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी टीम इंडियाला भक्कम सुरुवात करून दिली. वैभव आपल्या खेळीत केवळ दोन षटकारांसह 10 चेंडूंमध्ये 14 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, अभिषेक आठ चौकार आणि एका षटकारासह 24 चेंडूंमध्ये 43 धावा करून बाद झाला. सॅम करनच्या गोलंदाजीवर टॉम बँटनने त्याचा झेल घेतला, तर वैभव विल जॅक्सने यष्टीचीत केला.  या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत सात गडी गमावून 190 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. कर्णधार अय्यरने 22 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या. इशान किशन 40 चेंडूंमध्ये 49 धावा करून बाद झाला आणि त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक तीन बळी घेतले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *