Last Updated:
Singer Passes Away : त्यांनी गायनाच्या अशा क्षेत्रात प्रवेश केला, जे पुरुषप्रधान क्षेत्र मानलं जात होतं. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण, भारदस्त आवाजाने आणि प्रचंड उत्कटतेने त्यांना लोकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलं.
पंडवानी गायिका आणि पद्म पुरस्कार विजेत्या तीजन बाई यांचं निधन झालं. त्यांनी छत्तीसगडच्या लोककला आणि पंडवानी गायनाला जगभरात ओळख मिळवून दिली. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. छत्तीसगढच्या रायपूर एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
तीजन यांचा जन्म 8 ऑगस्ट 1956 रोजी भिलाईजवळील गनियारी गावात झाला. रिपोर्टनुसार वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचं झालं होतं. त्यांनी लग्नानंतरच गायला सुरुवात केली. त्यांनी गायनाच्या अशा क्षेत्रात प्रवेश केला, जे पुरुषप्रधान क्षेत्र मानलं जात होतं. त्या काळात स्त्रिया फक्त बसून गायली जाणारी वेदमतीच गाऊ शकत होत्या. तीजन बाईंनी ही परंपरा मोडून उभं राहून गायला सुरुवात केली. पंडवानी गाणाऱ्या त्या पहिल्या महिला गायिका होत्या.
त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी 10 रुपयांसाठी पहिल्यांदा गाणं गायलं. स्त्री असूनही पंडवानी गायल्यामुळे त्यांना त्यांच्या पारधी समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. त्यांना पतीचं घर सोडावं लागलं. पोट भरण्यासाठी लोकांच्या घरी त्यांनी कामं मागितली. त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं.
त्यांनी कपालिक शैलीत पंडवानी गायली. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण, भारदस्त आवाजाने आणि प्रचंड उत्कटतेने त्यांना लोकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलं. त्यांची गायनशैली इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की त्या गावांमध्ये लोकप्रिय झाल्या. लोक त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करू लागले.
तीजनबाईंनी महाभारतातील पात्रं आणि कथा रंगमंचावर जिवंत केल्या. जेव्हा हबीब तन्वीर यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केलं, तेव्हा त्यांना मोठी संधी मिळाली. त्या एक प्रतिष्ठित व्यक्ती बनल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या प्रतिभेने आणि आवाजाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील लोकांची मनं जिंकली. त्यांनी दुसरं लग्नही केलं.
त्यांना भारताचे तिन्ही सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री प्रदान करण्यात आले होते. 1988 मध्ये पद्मश्री पुरस्काराने, 2003 मध्ये पद्मभूषण आणि 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 5 जुलैला रविवारी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी रायपूर एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Singer Death : पद्म विजेत्या गायिकेने घेतला जगाचा निरोप! पंडवानी गाणारी पहिली महिला; 10 रुपयांसाठी गायलेलं पहिलं गाणं
