पुणे: पुण्याच्या तळेगाव दाभाडेत विकासकामांची पोलखोल करणारी धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनचं अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. यावेळी रस्ताचं फुटला (Pune Talegaon Dabhade) की काय? असा आभास झाल्यानं काही काळ नागरिक (Pune Talegaon Dabhade) भयभीत झाले. हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातील गंभीर हलगर्जीपणा यानिमित्ताने समोर आला. हा सगळा पराक्रम कंत्राटदारांनी केला आहे. दीड वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा (Pune Talegaon Dabhade) योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले. पुढील आठवड्यात या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्याचं ठरलं. पण तत्पूर्वी नगरपरषदेकडून शनिवारी पाईपलाईनची चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतून पाणी सोडण्यात आलं.(Pune Talegaon Dabhade)
मात्र काही क्षणांतच अचानकपणे रस्त्याच्या मधूनचं पाण्याचा मोठा फवारा उसळला आणि डांबरी रस्ता फुटला की काय? असा आभास सर्वांना झाला, यामुळं नागरिक काही काळ भयभीत झाले. ही थरारक आणि अचंबित करणारी घटना सीसीटीव्हीत कैद झाला. तपासणी दरम्यान पाईपलाईन जोडणी करताना, कंत्राटदार महाशयांनी दोन पाईप एकमेकांना जोडल्याचं नसल्याचं समोर आलं. त्यामुळं हा नको तो पराक्रम घडला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडूनच पाईपलाईनची दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाईल, अशी माहिती दिली आहे. यानिमित्ताने तळेगावच्या विकासाची आणि कंत्राटदारांच्या दर्जाची पोलखोल झाली.(Pune Talegaon Dabhade)
या घटनेमुळे शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरू होताच पाईपलाईनमधील त्रुटी उघड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित कामाची गुणवत्ता आणि त्यावर झालेल्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुदैवाने ही घटना चाचणीदरम्यान घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, याच ठिकाणी वाहतूक सुरू असताना किंवा नागरिकांची वर्दळ असताना अशी घटना घडली असती, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. त्यामुळे संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर