Diesel Blending : पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर, डिझेलमध्ये Isobutanol चं ब्लेंडिंग, इथेनॉलवरुन देशभर चर्चा सुरु असताना नितीन गडकरींनी सरकारचा प्लॅन सांगितला  


नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगद्वारे E20 फ्यूएलच्या वापरानंतर सरकार डिझेल संदर्भात आता मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत आता बायोफ्यूएलच्या वापराच्या दिशेनं पुढील पाऊल टाकण्यासाठी तयारी करत असल्याचं म्हटलं. सरकारकडून डिझेलमध्ये 15 टक्क्यांपर्यंत आयसोब्यूटेनॉल मिश्रित करण्याचं नियोजन केलं जात आहे. विदेशातून कराव्या लागणाऱ्या तेल आयातीवरील अवलंबित्व कमी केलं जावं यासाठी तसा विचार सुरु असल्याचं ते म्हणाले.

डिझेलमध्ये आयसोब्यूटेनॉल मिसळणार

नितीन गडकरी म्हणाले की इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिश्रित करता येणार नाही. त्यासाठी इथेनॉलपासून आयसोब्यूटेनॉल तयार करण्यावर काम केलं जात आहे. जे डिझेलमध्ये मिसळून चांगल्या प्रकारे वापरलं जाऊ शकतं. आयसोब्यूटेनॉल भविष्यात डिझेलचा चांगला पर्याय बनू शकतं. सरकार डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्यूटेनॉल मिसळण्याची परवानगी देण्यासाठी तयारी करत आहे. हे पाऊल देशाला ऊर्जा साधनांच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करणारे स्वच्छ इंधन तयार करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. 

नितीन गडकरी म्हणाले की सरकारनं 100 टक्के इथेनॉल आणि आयसोब्यूटेनॉलद्वारे दोन जनरेटर यशस्वीपणे चालवून पाहिले आहेत. त्यातून हे स्पष्ट झालं की अशा प्रकारची इंजिन बनवली जाऊ शकतात जी पूर्णपणे या प्रकारच्या इंधनावर चालतील. आयसोब्यूटेनॉलला नव्या पिढीतील उत्कृष्ठ बायोफ्यूएल मानलं जातं आहे. बायोफ्यूएलमुळं प्रदूषण देखील कमी होतं. याच्या वापरानं भारताच्या कच्चा तेलाची आयात कमी होईल आणि देशात बनवल्या जाणाऱ्या बायोफ्यूएलची मागणी वाढेल, असं नितीन गडकरी म्हणाले. 

केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं सरकारच्या E20 इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमाचं समर्थन केलं आहे.  इथेनॉलच्या वापरानं इंजिन खराब होत नाहीत, पर्यावरणाला नुकसान होत नाही, असंही सांगण्यात आलं आहे. मंत्रालयानं पुढे म्हटलं की भारतात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचं टार्गेट वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात आलं आहे. डिसेंबर 2025 मध्ये ते पूर्ण करण्यात आलं.  या योजनेतून सरकारनं 1.9 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं परकीय चलन वाचवल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *