PM Modi Australia Visit Threat : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील आठवड्यात 6 ते 11 जुलै दरम्यान तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार असून, 8 ते 10 जुलै दरम्यान त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी (PM Modi Australia Tour) त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी (PM Modi Death Threat) देण्यात आली आहे. या गंभीर घटनेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर (High Alert) आल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न (Melbourne) शहरात आयोजित होणाऱ्या पंतप्रधानांच्या एका भव्य कम्युनिटी प्रोग्रामच्या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टवर ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाची फेडरल पोलीस (AFP) यंत्रणा तातडीने ॲक्शन मोडमध्ये आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
Melbourne Meets Modi : ‘मेलबर्न मीट्स मोदी’ कार्यक्रमाच्या फेसबुक पोस्टवर धमकी
‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 9 जुलै रोजी मेलबर्न येथील प्रसिद्ध ‘मार्वल स्टेडियम’मध्ये (Marvel Stadium) ‘मेलबर्न मीट्स मोदी’ (Melbourne Meets Modi) या नावाच्या एका भव्य कम्युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी आणि भारतीय समुदायाला आमंत्रित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या.
या अंतर्गत फेसबुकवर करण्यात आलेल्या एका अधिकृत पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका माथेफिरूने थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत धमकीवजा कमेंट केली. या कमेंटमुळे दोन्ही देशांच्या गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणांचे कान टोकारले गेले आहेत.
Abu Mustafa Facebook Threat Comment : ‘अबू मुस्तफा’ नावाच्या अकाऊंटवरून धमकी
रिपोर्टनुसार, ही आक्षेपार्ह टिप्पणी ‘अबू मुस्तफा’ (Abu Mustafa) नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आली आहे. या कमेंटमध्ये लिहिले होते की, “कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेडियमचे छत (Rooftop) पूर्णपणे बंद ठेवलेले बरे, अन्यथा तो ऑस्ट्रेलियात स्वतःच्या मृत्यूसाठीच येईल.” स्टेडियमच्या छताचा आणि संरक्षणाचा उल्लेख करत थेट जीवे मारण्याची भाषा वापरल्यामुळे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. ज्या दिवशी ही कमेंट ऑनलाइन आली, त्याच दिवशी हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांकडे (AFP) सोपवण्यात आले.
AFP Traced IP Address : ऑस्ट्रेलियन पोलिसांना मोठे यश; आरोपीचा ‘आयपी ॲड्रेस’ शोधला
या संवेदनशील प्रकरणाचा तपास करणाऱ्या ऑस्ट्रेलियन तपास अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फेसबुक पोस्टवर कमेंट करणाऱ्या संबंधित अकाऊंटचा ‘आयपी ॲड्रेस’ (IP Address) शोधून काढला आहे. हा कमेंट करणारा व्यक्ती नेमका कोण आहे, तो कुठे राहतो आणि या धमकीमागे त्याचा मुख्य हेतू किंवा काही आंतरराष्ट्रीय कट कारस्थान (Larger Conspiracy) आहे का, याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच या कृत्याद्वारे देशाच्या फौजदारी कायद्यांचे (Criminal Offences) उल्लंघन झाले असल्याने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे.
Security Tightened For PM Modi : ऑस्ट्रेलियात कडक नियमावली
ऑस्ट्रेलियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या किंवा जागतिक नेत्याच्या दौऱ्यादरम्यान उद्भवणाऱ्या अशा सुरक्षा धोक्यांकडे ऑस्ट्रेलियन लॉ एन्फोर्समेंट एजन्सी अत्यंत संवेदनशीलतेने पाहतात. पंतप्रधान मोदींच्या या हाय-प्रोफाइल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियाची फेडरल पोलीस (AFP), प्रांताचे राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा रक्षक युनिट्स (Specialist Protective Security Units) एकत्र आले असून, मार्वल स्टेडियमसह संपूर्ण मेलबर्न शहरात सुरक्षा व्यवस्था अभेद्य करण्यात आली आहे. या धमकीनंतरही पंतप्रधान मोदींचा दौरा पूर्वनियोजित वेळेनुसारच पार पडेल, असे सांगण्यात येत आहे.
ही बातमी वाचा:
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर