Missing Link :…म्हणे महाराष्ट्र थांबणार नाही! मिसिंग लिंकवर ‘विकासचं मिसिंग’, 2 महिन्यात झाली अशी अवस्था, VIDEO व्हायरल | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मिसिंग लिंकचं लोकार्पण सोहळा पार पडला. पण, दोन महिने होत नाही तेच

News18
News18

खंडाळा : ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असं म्हणत राज्य सरकारने राज्यभरात होर्डिंगबाजी केली. दोनच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मिसिंग लिंकचं लोकार्पण सोहळा पार पडला. पण, दोन महिने होत नाही तेच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचं समोर आलं आहे. या खड्ड्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई आणि पुणे शहराला जोडणाऱ्या मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण दिवसेंदिवस वाढत चालली होती. यावर तोडगा म्हणून  खोपोली एक्झिट ते कुसगाव लोणावळा दरम्यानचा ‘बोरघाट’ हा अत्यंत कठीण आणि धोकादायक टप्पा होता इथं हा मिसिंग लिंक उभारण्यात आला. इंजिनियअरिंगचा अद्भूत प्रयोग म्हणून मिसिंग लिंककडे पाहिले जात आहे. ७,१८१ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  दोन महिन्यांपूर्वी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंक चे उद्घाटन करण्यात आलं होतं.

मात्र, याच मिसिंग लिंकचे पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. मिसिंग लिंकवरील केबल स्टड दरी पुलावर खड्डे पडले आहे. पहिल्याच पावसामध्ये खड्डे पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खड्डे पडल्यानंतर तातडीने डागडुजी करण्यात आली आहे. खड्डे हे बुजवण्यात आले आहे.

पण, दोन महिने होत नाही तेच मिसिंग लिंकवर खड्ड्यांमुळे मिसिंग लिंकचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पहिल्याच पावसात जर अशा प्रकारे मिसिंग लिंकवर खड्डे पडत असतील तर या मार्गावर अतिशय वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरक्षित आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/

Missing Link :…म्हणे महाराष्ट्र थांबणार नाही! मिसिंग लिंकवर ‘विकासचं मिसिंग’, 2 महिन्यात झाली अशी अवस्था, VIDEO व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *