Last Updated:
Pune News: एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये एका कामगाराच्या अमानुष कृत्यामुळे त्याच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका सहकाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवला. या भयानक कृत्यामुळे पोटात प्रचंड दाबाने हवा गेल्याने 42 वर्षीय परप्रांतीय कामदाराचा मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील ‘वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि.’ या नामांकित कंपनीत घडली.
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव नरेश सुलेंद्र यादव आणि आरोपीचे नाव बिकीकुमार भाईलाल सरोज आहे. मृत कामगार आणि आरोपी दोघेही या कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये एकत्र काम करत होते. 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास रात्रीची शिफ्ट संपत आली होती. सर्व कामगार आपले काम आटोपण्याच्या तयारीत होते. दरम्यान, आरोपी बिकीकुमार सरोज याने अचानक तेथे असलेल्या उच्च दाबाच्या एअर कॉम्प्रेसरचा पाईप नरेश यादव यांच्या गुदद्वारात घुसवला.
उपचारादरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू
कॉम्प्रेसरमधून सुटणारी हवा अत्यंत उच्च दाबाची होती. ही हवा थेट नरेश यादव यांच्या शरीरात आणि पोटात वेगाने शिरली. हवेच्या प्रचंड दाबामुळे त्यांच्या पोटातील फुफ्फुस, आतडे आणि इतर अंतर्गत नाजूक अवयवांना गंभीर इजा झाली. या असह्य वेदनेमुळे नरेश यादव जागीच कोसळले आणि विव्हळू लागले. नरेश यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचे पाहून त्यांना कंपनीतील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भयानक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ
याप्रकरणी मृत नरेश यादव यांचे मेहुणे संतोषकुमार किशोर यादव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी बिकीकुमार भाईलाल सरोज याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कंपनीत रात्रीच्या शिफ्टदरम्यान झालेल्या या भयानक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
Pune,Maharashtra
पुण्यात थरकाप! प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरून कामगाराला तडपवून मारलं; सणसवाडीच्या कंपनीत सहकाऱ्याचं अघोरी कृत्य
