वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या सामन्यात फसला, आक्रमक बाणा पाहून इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डाव – Marathi News | IND vs ENG T20 Vaibhav Sooryavanshi dismissed for 14 runs in his debut match stumped while facing spin bowling


वैभव सूर्यवंशी पदार्पणाच्या सामन्यात फसला, आक्रमक बाणा पाहून इंग्लंडच्या कर्णधाराने टाकला असा डावImage Credit source: BCCI Twitter

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. त्याला कारण होतं वैभव सूर्यवंशी.. त्याला या सामन्यात संधी मिळणार की नाही याकडे नजरा खिळल्या होत्या. अखेर 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 कारकि‍र्दीला सुरूवात केली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. संधी मिळाली, पण पदार्पणाच्या सामन्यात काय करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. कारण आयपीएल 2026 स्पर्धेत त्याने दिग्गज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याचा आक्रमक बाणा पाहायला मिळेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींना होता. वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरूवात केली. पण मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला.

वैभव सूर्यवंशी 10 चेंडू असा खेळला

वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूंचा सामना केला आणि 2 षटकारांसह 14 धावा करून बाद झाला. त्याचा स्ट्राईक रेट हा 140चा होता. वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना जोश टंगचा केला. पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर वाइड टाकला आणि चौकार आला. पण या धावा काही त्याच्या नव्हत्या. त्यानंतर परत टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांना सुरूवात झाली. त्यानंतर त्याचा सामना जोफ्रा आर्चरशी झाला. त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि त्यानंतर 1 धाव घेतली. जोश टंग गोलंदाजीला परत आला आणि त्याला पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर लेग बाय धाव आली. आक्रमक बाणा पाहून कर्णधाराने विल जॅक्सच्या हाती चेंडू सोपवला. या षटकात पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्यासाठी पुढे सरसावला आणि यष्टीचीत झाला.

कर्णधार हॅरी ब्रूकचा डाव यशस्वी

वैभव सूर्यवंशी वेगवान गोलंदाजांना आक्रमक खेळत असल्याचं पाहून कर्णधार हॅरी ब्रूकने फिरकीपटू विल जॅक्सनच्या हाती चेंडू सोपवला. हॅरी ब्रूकचा हा डाव यशस्वी ठरला आणि वैभवचा डाव अवघ्या 14 धावांवर संपुष्टात आला. नाणेफेकीवेळी हॅरी ब्रूकला वैभव सूर्यवंशीबाबत प्रश्न विचारला गेला होता, तेव्हाच त्याने त्याचं उत्तर दिलं होतं. तुम्ही त्या ‘बॉय वंडर’बद्दल अभ्यास केला आहे का? या प्रश्नावर हॅरी ब्रूक म्हणाला की, हो, आम्ही थोडाफार अभ्यास केला आहे. आम्हाला काही रणनीतिक निर्णय घ्यायचे आहेत. आम्ही रणनीतिक निर्णयांचा विचार करत आहोत. फक्त मैदानावर असताना त्याची अंमलबजावणी करायची आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *