Welcome to the Jungle Box Office Collection: अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the jungle) या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घातला. हा सिनेमा 26 जून (26 June) रोजी सिनेमागृहांमध्ये (Box Office Collection) रिलीज करण्यात आला होता. रिलीज होण्याच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाच्या कमाईत धडाकेबाज वाढ झाली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं 92 कोटींचे कलेक्शन केले आहे. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात (Entertainment) शानदार एन्ट्री केली आहे. या आठवड्यात आलिया भट्टचा ‘अल्फा’ हा सिनेमा रिलीज झाला. सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाला ‘अल्फा’ची टक्कर आहे. 8व्या दिवशी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने पेड प्रीव्ह्यूमध्ये 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, पहिल्या दिवशी या सिनेमाने 15.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 20 कोटींचे कलेक्शन केले. तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमा 20.75 कोटी कमावले. दरम्यान, विकेंडनंतर विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमानं 8व्या दिवशी किती कोटी कमावले? (Welcome to the Jungle 8th day box office collection)
पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 93.15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या आठवड्यात दमदार बॉक्स ऑफिस कलेक्शन केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने एन्ट्री केली आहे. या आठवड्यात वायआरएफ स्पाय यूनिव्हर्सचा ‘अल्फा’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामुळे ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाच्या टक्करमध्ये ‘अल्फा’ हा सिनेमा आहे. आलिया भट्टच्या सिनेमाचा थेट फटका अक्षय कुमारच्या चित्रपटाला बसला आहे.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाने रिलीजच्या आठव्या दिवशी 4.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. म्हणजेच आतापर्यंत या सिनेमाने 97.65 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. दरम्यान, या सिनेमाला प्रेक्षकांकडून असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास, लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल यात शंका नाही. दुसरा शनिवार म्हणजेच 9 व्या दिवशी हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: