Weekly Horoscope: धनु, मकर राशीचे मेहनतीचे फळ मिळण्याची हीच वेळ, जुलैचा नवा आठवडा कसा असेल? कोण नशीबवान? साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 6 To 12 July 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिना अनेकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे, ज्यामुळे दुसरा आठवडा हा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – या आठवड्यात प्रेमसंबंधात संयम आवश्यक आहे. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यावर परिणाम करू शकतात. जोडीदाराला वेळ दिल्यास नाते अधिक घट्ट होईल.

करिअर (Career) – करिअरच्या बाबतीत नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायात विस्ताराचे नियोजन करता येईल.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मात्र अनियोजित खर्च टाळा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.

आरोग्य (Health) – प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आरोग्य चांगले ठेवेल.

मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढेल. अविवाहितांना चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे.

करिअर (Career) – या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारेल. जुनी देणी वसूल होतील. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार पुढे सरकू शकतो.

आरोग्य (Health) – आठवड्यात पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जड वस्तू उचलणे टाळा आणि नियमित व्यायाम करा.

हेही वाचा :

Lord Shiv: शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात? काय आहे यामागील महत्त्व, शास्त्र अन् फायदे? जाणून व्हाल थक्क…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *