Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबई, ठाणे, कोकणात 6 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा; देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?


Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या अलर्टचे तंतोतंत पालन करा. कारण, पुढील दोन दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Heavy Rain) आणि वादळं येण्याची शक्यता असल्याचे देवेंद्र  फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Rain news)

ठाणे, रायगड, पालघर असेल पुण्याचा काही भाग, नाशिक याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. या भागात सातत्याने 6 जूनपर्यंत मुसळधार  पाऊस असेल, वादळंही येतील. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  आपण दर तीन तासांनी आपण या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांन विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता ज्याप्रकारे पाऊस आणि वादळ आहे काही अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून अलर्ट  पाठवले जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. माझी लोकांना विनंती आहे की,  आपण नीट अलर्ट देतोय , लोकांनी ते अलर्ट फॉलो करावेत, शक्यतो त्याप्रमाणे बाहेर पडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहाटेपासून ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. मुंबई आणि पालघर जिल्ह्याला पुढील काही तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट असून या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वसई आणि विरार परिसरातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. नालासोपारा परिसरातही कंबरेइतके पाणी साचले आहे. समुद्राला दुपारी दोनच्या सुमारास भरती आली आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai School: मुंबईतील शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय 

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज, शनिवार (4 जुलै 2026) रोजी मुंबईतील सर्व महापालिका तसेच संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सकाळच्या सत्रासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, आजही अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज अतिवृष्टी विषयक हवामान खात्याच्या अहवालानुसार नुसार  माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे आदेशानुसार शाळांना दुपार सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत आलेले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचतील याबाबत मुख्याध्यापक शिक्षकांनी दक्षता घ्यावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

आणखी वाचा

Mumbai Rains: मुंबईत धडकी भरवणारं दृश्य, भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब झालं, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *